२८ पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 01:26 AM2018-07-04T01:26:17+5:302018-07-04T01:28:09+5:30
स्थानिक पोलीस ठाण्यातून जिल्ह्यात इतरत्र ठिकाणी स्थानांतरण झालेल्या २८ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी आयोजित कार्यक्रमात सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : स्थानिक पोलीस ठाण्यातून जिल्ह्यात इतरत्र ठिकाणी स्थानांतरण झालेल्या २८ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी आयोजित कार्यक्रमात सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देसाईगंज पोलीस स्टेशनचे ठाणेदार मांडवकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कुरखेडाचे ठाणेदार गजानन पडळकर, पुराडाचे ठाणेदार उमेश महल्ले, मालेवाडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलीस उपनिरीक्षक गुरुकर, भाजपचे जिल्हा सचिव विलास गावंडे, तालुकाध्यक्ष राम लांजेवार, सिनेट सदस्य चांगदेव फाये, नगरसेवक अॅड.उमेश वालदे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय भैसारे, उपाध्यक्ष बंडूभाऊ लांजेवार, सचिव नाशिर हासमी, सिराज पठाण, कृष्णा चौधरी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी स्थानांतरीत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थित मान्यवरांचे हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून ठाणेदार पडळकर यांनी घडवून आणलेल्या या उपक्रमाची प्रशंसा करीत स्थानांतरण झालेल्या पोलीस कर्मचाºयांना पुढील कर्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी स्थानांतरित पोलीस कर्मचाºयांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुराडाचे ठाणेदार उमेश महल्ले यांनी केले संचालन प्रा.विनोद नागपूरकर यांनी केले.