नऊ तालुक्यातून २८४ नामांकन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:45 AM2020-12-30T04:45:41+5:302020-12-30T04:45:41+5:30

गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासह सोमवारपासून दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठीही नामांकन दाखल करणे सुरू झाले. त्यामुळे ९ तालुक्यातून सोमवारी ...

284 nominations filed from nine talukas | नऊ तालुक्यातून २८४ नामांकन दाखल

नऊ तालुक्यातून २८४ नामांकन दाखल

Next

गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासह सोमवारपासून दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठीही नामांकन दाखल करणे सुरू झाले. त्यामुळे ९ तालुक्यातून सोमवारी २८४ नामांकन दाखल झाले. मात्र दुसऱ्या टप्प्यातील अहेरी, एटापल्ली आणि मुलचेरा या तीन तालुक्यातून एकही नामांकन आले नाही. त्यांच्यासाठी १ जानेवारी ही नामांकन भरण्याची शेवटची मुदत आहे.पहिल्या टप्प्यातील सहा ग्रामपंचायतींसाठी ३० डिसेंबरपर्यंत नामांकन भरता येणार आहे. तीन दिवसांच्या सलग सुट्यांमुळे सोमवारी ठिकठिकाणच्या तहसील कार्यालयात नामांकन भरणाऱ्यांसह त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती. यात सर्वाधिक ९७ नामांकन गडचिरोली तालुक्यातून आले. याशिवाय कुरखेडा ६६, देसाईगंज ३८, आरमोरी ४१, कोरची ८, आणि धानोरा तालुक्यातून २६ नामांकन आले.

दुसऱ्या टप्प्यातील चामोर्शी तालुक्यातून ५, सिरोंचा २ आणि भामरागड तालुक्यातून १ नामांकन आले. पण राजकीयदृष्ट्या महत्वाचा तालुका असलेल्या अहेरी येथे दिवसभरात एकही नामांकन दाखल झाले नाही. पहिल्या टप्प्यासाठी आता दोनच दिवस शिल्लक असल्याने पुढील दोन दिवस नामांकन भरणाऱ्यांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

(बॉक्स)

अविरोध निवडीसाठी आ.गजबेही सरसावले

गडचिरोली, अहेरी विधानसभा मतदार संघाप्रमाणे आता आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांनीही अविरोध निवडल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींना विविध विकास कामांसाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून २५ लाखांचा निधी दिला जाईल, असे जाहीर केले. त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक टाळून सामंजस्याने आणि सर्वसहमतीने सदस्यांची निवड होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. त्याला गावकऱ्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: 284 nominations filed from nine talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.