गोंडवाना विद्यापीठात २९ पदे रिक्त

By admin | Published: October 17, 2015 02:03 AM2015-10-17T02:03:16+5:302015-10-17T02:03:16+5:30

चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी २ आॅक्टोबर २०११ रोजी सुरू करण्यात आलेल्या गडचिरोलीस्थित गोंडवाना विद्यापीठात एकूण २९ पदे रिक्त आहेत.

29 posts vacant in Gondwana University | गोंडवाना विद्यापीठात २९ पदे रिक्त

गोंडवाना विद्यापीठात २९ पदे रिक्त

Next

पदभरतीकडे दुर्लक्ष : प्रशासकीय कामकाजावर परिणाम
गडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी २ आॅक्टोबर २०११ रोजी सुरू करण्यात आलेल्या गडचिरोलीस्थित गोंडवाना विद्यापीठात एकूण २९ पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यापीठाच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र घेण्यासाठी व इतर शैक्षणिक कामांसाठी वारंवार विद्यापीठात चकरा माराव्या लागत आहे.
गोंडवाना विद्यापीठात वर्ग १ ते ४ ची एकूण १६४ पदे मंजूर आहेत. यापैकी सरळसेवा भरतीने १२९ व पदोन्नतीने १० असे एकूण १३५ पदे भरण्यात आली आहे. सध्य:स्थितीत गोंडवाना विद्यापीठात पदोन्नतीची २५ व सरळसेवेचे ४ असे एकूण २९ पदे रिक्त आहेत.
गोंडवाना विद्यापीठात वर्ग १ ची उपकुलसचिवाचे एक पद, सहाय्यक कुलसचिवाचे दोन पदे रिक्त आहेत. वर्ग २ ची अधीक्षकांची दोन पदे रिक्त आहेत. वर्ग ३ मधील निवडश्रेणी लिपीक सहा, उच्च श्रेणी लिपीक आठ, निम्म श्रेणी लिपीक सहा पदे रिक्त आहेत. वर्ग १ व २ ची पदे रिक्त असल्याने एकाच अधिकाऱ्याला अनेक टेबलावरील कार्यभार सांभाळावा लागत आहे. आस्थापनेसह विविध विभागात अनेक प्रस्तावांच्या फाईल शेकडोच्या संख्येने जमा झाल्या आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विहीत कालावधीत विद्यापीठात महाविद्यालय व विद्यार्थ्यांकडून सादर झालेले अनेक प्रस्ताव निकाली काढण्यात अडचण येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी विविध प्रमाणपत्रांसाठी गोंडवाना विद्यापीठात वारंवार येत असल्याचे चित्रही दिसून येत आहे.
विद्यापीठाच्या प्रशासकीय कामाची गती वाढविण्यासाठी शासनाने तत्काळ येथील रिक्तपदे भरण्यासाठी मंजुरी प्रदान करावी, अशी मागणी शिक्षणप्रेमींकडून होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 29 posts vacant in Gondwana University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.