तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी 3 लाख लिटर मेटारायझियम तयार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2021 05:00 AM2021-08-08T05:00:00+5:302021-08-08T05:00:18+5:30
कृषी विभागाकडून जैविक कीटकनाशक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. तीन लाख लिटर मेटारायझियममुळे ३० हजार हेक्टर भात लागवड क्षेत्रावरील तुडतुडे किडीचे नियंत्रण होणार आहे. तसेच जैविक औषधांच्या वापरामुळे निसर्गाचे रक्षण होऊन शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करणार. मेटारायझियमकरिता शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहायक, कृषिमित्र यांच्याकडे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : क्रॉपसॅप याेजनेंतर्गत आपत्कालीन समस्येवर मात करण्यासाठी जैविक निविष्ठांचा १ हजार ५०० लिटर पुरवठा करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील गट प्रतिनिधी, कृषिमित्र किंवा प्रगतशील शेतकरी यांना १ लिटर मेटारायझियम तयार होते. एकंदरीत जिल्ह्यात ३ लाख लिटर मेटारायझियम तयार होणार आहे. हे मेटारायझियम १० रुपये प्रतिलिटरप्रमाणे स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी कळविले.
धान पिकाचे भरपूर उत्पादन व्हावे यासाठी शेतकरी वारेमाप रासायनिक खतांचा वापर करतात. नत्रयुक्त खतांमध्ये धान पिकावर माेठ्या प्रमाणावर मावा, तुडतुडा यासह विविध राेगांचा प्रादुर्भाव हाेताे. धानपीक गर्भावस्थेत असताना पिकांवर कीड व राेग येत असल्याने त्याचा परिणाम एकूणच उत्पादनावर हाेताे. कीड व राेगांचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी शेतकरी पुन्हा रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात. परंतु नियंत्रण मिळत नाही. यात शेतकऱ्यांना बराच पैसा खर्च करावा लागताे.
कृषी विभागाकडून जैविक कीटकनाशक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. तीन लाख लिटर मेटारायझियममुळे ३० हजार हेक्टर भात लागवड क्षेत्रावरील तुडतुडे किडीचे नियंत्रण होणार आहे. तसेच जैविक औषधांच्या वापरामुळे निसर्गाचे रक्षण होऊन शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करणार. मेटारायझियमकरिता शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहायक, कृषिमित्र यांच्याकडे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
५७० लाख रुपयांची हाेणार बचत
- रासायानिक औषधांच्या फवारणीकरिता हेक्टरी दोन हजार रुपये अंदाजे खर्च होतो. म्हणजेच रासायनिक औषधाने सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्र नियंत्रित करण्याकरिता ६०० लाख इतका खर्च शेतकऱ्यांचा होतो. मेटारायझियमचा वापर केल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लिटर कीटकनाशकाची आवश्यकता असते, अशी दाेनवेळा फवारणी केल्यास तुडतुडे कीड पूर्णत: नियंत्रित होते. यावरून शेतकऱ्यांना हेक्टरी १०० रुपये खर्च येणार, म्हणजेच ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील कीड नियंत्रित करण्याकरिता केवळ ३० लाख रुपये लक्ष खर्च होणार. सदर उपक्रमामुळे रासायनिक औषधांवरील सुमारे ५७० लाख रुपये खर्च कमी होऊन शेतकऱ्यांची बचत होणार आहे.