३ हजार १५१ उमेदवारांनी दिली परीक्षा
By admin | Published: April 17, 2017 01:35 AM2017-04-17T01:35:12+5:302017-04-17T01:35:12+5:30
गडचिरोली पोलीस शिपाई पदाच्या १६९ जागांसाठी १६ एप्रिल रोजी रविवारला जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर लेखी परीक्षा घेण्यात आली.
१६९ पदांसाठी पोलीस भरती : ४२७ उमेदवार परीक्षेस गैरहजर
गडचिरोली : गडचिरोली पोलीस शिपाई पदाच्या १६९ जागांसाठी १६ एप्रिल रोजी रविवारला जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर लेखी परीक्षा घेण्यात आली. महिला व पुरूष मिळून एकूण ३ हजार १५१ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली.
पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये विविध प्रवर्गातील शारीरिक व मैदानी चाचणीमध्ये पात्र महिला आणि पुरूष उमेदवारांपैकी १:१५ याप्रमाणे २ हजार ८१८ पुरूष व ७६० महिला अशा एकूण ३ हजार ५७८ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी संधी देण्यात आली होती. त्यापैकी ३ हजार १५१ उमेदवारांनी परीक्षेस हजेरी लावली. ४२७ उमेदवार लेखी परीक्षेला अनुपस्थित होते. सदर परीक्षेसाठी उमेदवारांना लेखनी पॅड व बालपेन पोलीस विभागामार्फत पुरविण्यात आले. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सदर परीक्षा सकाळी ७ ते ८.३० या वेळेत घेण्यात आली. जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली. मैदानावर चोख पोलीस बंदोबस्त होता. (स्थानिक प्रतिनिधी)
प्रक्रिया पारदर्शक
लेखी परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याच्या दृष्टीने उमेदवारांची तपासणी तसेच पूर्णवेळ व्हिडीओ रेकॉर्डींगची व्यवस्था परीक्षा केंद्रावर करण्यात आली होती. याशिवाय उमेदवारांसाठी तत्काळ वैद्यकीय मदतीची व्यवस्था परीक्षा केंद्रावर उपलब्ध होती.