धान विक्री नाेंदणीसाठी ३० पर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:40 AM2021-09-22T04:40:20+5:302021-09-22T04:40:20+5:30

चामोर्शी येथे शासनाच्या आधारभूत किमत खरेदी योजनेंतर्गत शेतमाल धान खरेदी करण्याकरिता २० सप्टेंबरपासून नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी ...

Up to 30 days for registration of sale of paddy | धान विक्री नाेंदणीसाठी ३० पर्यंत मुदत

धान विक्री नाेंदणीसाठी ३० पर्यंत मुदत

Next

चामोर्शी येथे शासनाच्या आधारभूत किमत खरेदी योजनेंतर्गत शेतमाल धान खरेदी करण्याकरिता २० सप्टेंबरपासून नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी धान उत्पादन घेतल्याची नोंद असलेला स्वतःचा सातबारा, गाव नमुना- ८, आधार कार्डची झेराॅक्स, बँक पासबुकची झेराॅक्स, संमतीपत्र, मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रे खरेदी केंद्रांच्या ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजता पर्यंत नोंदणी करण्यासाठी जमा करण्यात यावे. सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपमध्ये स्वत:च्या शेतमालाची नोंद करूनच सन २०२१-२२ या चालू सत्रातील सातबारे दिलेल्या ठिकाणी जमा करावे, असे चामोर्शी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गुरुदास चाैधरी यांनी केले आहे.

बाॅक्स

येथे करावे कागदपत्र सादर

चामोर्शी, गणपूर व कुनघाडा खरेदी केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावातील शेतकऱ्यांनी चामोर्शी तालुका सहकारी खरेदी-विक्री संस्थेच्या कार्यालयात सातबारे जमा करावे. येणापूर व सुभाषग्राम खरेदी केंद्रांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार कार्यालय, चित्तरंजनपूर (येणापूर) येथे सातबारे जमा करावे. आष्टी व गणपूर खरेदी केंद्रांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार समिती कार्यालय आष्टी येथे सातबारा जमा करावे. मुलचेरा, सुंदर नगर व मथुरा नगर केंद्रांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार समिती गोदाम, विवेकानंदपूर येथे नाेंदणी करावी, असे आवाहन केले आहे.

Web Title: Up to 30 days for registration of sale of paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.