८० सभासदांना ३० लाखांचे पीककर्ज

By admin | Published: June 10, 2016 01:35 AM2016-06-10T01:35:42+5:302016-06-10T01:35:42+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आसरअल्ली शाखेच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून ८० सभासदांना जवळपास ३० लाखांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे.

30 lakhs crop loans for 80 members | ८० सभासदांना ३० लाखांचे पीककर्ज

८० सभासदांना ३० लाखांचे पीककर्ज

Next

आसरअल्लीत वितरण : पाच दिवसांत शेतकऱ्यांना मिळाला लाभ
आसरअल्ली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आसरअल्ली शाखेच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून ८० सभासदांना जवळपास ३० लाखांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे खरीपपूर्व हंगाम तसेच बी- बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत झाली आहे.
जिल्हा सहकारी बँक शाखेचे १ कोटी २० लाख पीककर्ज उद्दिष्ट आहे. सदर उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता बँकेमार्फत सभासदांना पीक कर्ज वितरित केले जात आहे. परिसरातील झिंगानूर, पातागुड्डम, कोर्ला, रामशगुडम, सोमनूर, सोमनपल्ली आदी गावांमध्ये जवळपास २० हजार बँकेचे ग्राहक आहेत. या ग्राहकांना बँकेमार्फत सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
सन २०१५- १६ मधील पीक कर्ज वसुली ८५ टक्के झालेली आहे. केवळ १५ टक्केच कर्ज वसुली होणे बाकी आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार यांनी दिली.
पीक कर्ज वितरण कार्यक्रमाला व्यवस्थापक व्ही. एन. भंडारीवार, निरीक्षक एस. एस. गलबले, सचिव जयराम पांडवला, काका मल्लया, गजानन कलाक्षपवार उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: 30 lakhs crop loans for 80 members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.