३०० वर विदर्भवादी कार्यकर्ते नागपूरला जाणार

By admin | Published: October 2, 2016 02:05 AM2016-10-02T02:05:53+5:302016-10-02T02:05:53+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्य स्थापन करण्यात यावे या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ३ व ४ आॅक्टोबर रोजी नागपूर

On 300, the Vidarbhavtak activists will go to Nagpur | ३०० वर विदर्भवादी कार्यकर्ते नागपूरला जाणार

३०० वर विदर्भवादी कार्यकर्ते नागपूरला जाणार

Next

गडचिरोली जिल्ह्यातून : प्रतीरूप विधानसभा भरणार
गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्य स्थापन करण्यात यावे या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ३ व ४ आॅक्टोबर रोजी नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात दुसऱ्यांदा विदर्भाची प्रतीरूप विधानसभा भरविण्यात येणार आहे. या प्रतीरूप विधानसभेत सहभागी होण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातून ३०० वर विदर्भवादी कार्यकर्ते नागपूरकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक अरूण पाटील मुनघाटे यांनी दिली आहे.
विदर्भाच्या या प्रतीरूप विधानसभेत विदर्भाच्या सर्वांगिण विकासाचे मॉडेल ठेवण्यात येणार आहे. शिवाय विदर्भ विकासावर सखोल चर्चा होणार आहे. विदर्भाच्या पाचही सिमेवरून पाच विदर्भदिंडी यात्रा निघणार असून यातील सहभागी विदर्भवादी कार्यकर्ते ५ डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर धडकणार आहेत. विधानभवनासमोर ठिय्या आंदोलनही करण्यात येणार आहे. वरील दोन्ही कार्यक्रमात विदर्भवाद्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा समन्वयक अरूण पाटील मुनघाटे, सहसमन्वयक रघुनाथ तलांडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर, समय्या पसुला, परशुराम सातार, रमेश उपलवार, चंद्रशेखर भडांगे, सुधाकर नाईक, मनमोहन बंडावार, शालिक नाकाडे, गोवर्धन चव्हाण, प्रतीभा चौधरी, वैष्णवी राऊत, अमिता लोणारकर, मंदा तुरे, मिनाक्षी गेडाम, गौरव नागपूरकर, चंद्रशेखर गडसुलवार, नितेश अमलापुरीवार, रमेश भुरसे, एजाज शेख, अशोक पोरेड्डीवार, प्रमोद भगत, राजू जक्कनवार, दत्तात्रय बर्लावार, पांडुरंग घोटेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: On 300, the Vidarbhavtak activists will go to Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.