अपूर्व मेळाव्यात ३०१ प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2016 12:16 AM2016-02-11T00:16:36+5:302016-02-11T00:16:36+5:30

गटसाधन केंद्र व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, गडचिरोली तसेच राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांच्या संयुक्त ....

301 replica of the Apoorva Melawa | अपूर्व मेळाव्यात ३०१ प्रतिकृती

अपूर्व मेळाव्यात ३०१ प्रतिकृती

Next

४२ शाळांचा सहभाग : गडचिरोली व गुरवळात कार्यक्रम
गडचिरोली : गटसाधन केंद्र व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, गडचिरोली तसेच राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील शिवाजी हायस्कूल व नवयुवक विद्यालय गुरवळा येथे ५ ते ६ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या तालुकास्तरीय अपूर्व विज्ञान मेळाव्यात ४२ शाळांच्या ३०१ विज्ञान प्रतिकृती सादर करण्यात आल्या.
मेळाव्याचे उद्घाटन डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता रवींद्र रमतकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी (माध्य) नानाजी आत्राम, गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे उपस्थित होते.
गडचिरोली येथील शिवाजी हायस्कूलमध्ये पार पडलेल्या मेळाव्यात अमिर्झा, आंबेशिवणी, बोदली, काटली, मुरखळा तसेच नवयुवक विद्यालय गुरवळा येथे पार पडलेल्या मेळाव्यात येवली, पोटेगाव, गुरवळा, केंद्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विज्ञानाचा कार्यकारणभाव समजून समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याबाबत प्रयत्न करावे, असे आवाहन आत्राम यांनी केले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दिवटे, कवठे, वासेकर, रूपेश बारसागडे, राकेश दासरवार यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 301 replica of the Apoorva Melawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.