धानोराच्या लोकन्यायालयात ३२ प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:40 AM2021-09-26T04:40:16+5:302021-09-26T04:40:16+5:30
याप्रसंगी पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) एच. पी. पंचोली, विशेष सहायक सरकारी अभियोक्ता बी. के. खोब्रागडे, ...
याप्रसंगी पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) एच. पी. पंचोली, विशेष सहायक सरकारी अभियोक्ता बी. के. खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्त्या व विधि स्वयंसेवक यामिनी नागापुरे यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले. या लोकन्यायालयात प्रलंबित फौजदारी व दिवाणी प्रकरणे ३१ ठेवण्यात आलेली होती, तसेच दाखल पूर्व प्रकरणे १४१ ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी काैटुंबिक हिंसाचाराचे १ प्रकरण निकाली काढण्यात आले, तसेच दाखल पूर्व ३१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये १० लाख ७० हजार ७६१ इतक्या रकमेची तडजोड झाली. यशस्वतेकरिता या न्यायालयातील वरिष्ठ लिपिक एस. डी. जावरकर, व्ही. एन. सहारे, डी. पी. टेमकर, लघुलेखक ए. एम. कोडाप, कनिष्ठ लिपिक टी. डी. खोब्रागडे, सी. एम. एस. खांडेकर, पी. बी. न्यालेवार, शिपाई एम. एम. कुमोटी यांनी सहकार्य केले.
250921\img-20210925-wa0048.jpg
धानोरा येथे राष्ट्रीय लोकन्यायालय