जिल्हाभरात 34 माध्यमिक शिक्षक आढळले काेराेनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 05:00 AM2020-11-22T05:00:00+5:302020-11-22T05:00:19+5:30

२३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. काेराेनाचे संकट कायम असतानाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, यासाठी शासनाने वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करताना विद्यार्थी काेराेनाबाधित हाेणार नाही, यासाठी पूर्ण खबरदारी शासनामार्फत घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षकांची काेराेना तपासणी केली जात आहे. शिक्षण विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांना शिकविणारे एकूण २ हजार ७५६ शिक्षक आहेत.

34 secondary teachers were found in the district | जिल्हाभरात 34 माध्यमिक शिक्षक आढळले काेराेनाबाधित

जिल्हाभरात 34 माध्यमिक शिक्षक आढळले काेराेनाबाधित

Next
ठळक मुद्देशाळा सुरू करण्याची पूर्वतयारी : २,७५६ शिक्षकांची हाेणार तपासणी

  लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांची काेराेना तपासणी केली जात आहे. शनिवारपर्यंत ९०२ शिक्षकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३४ शिक्षक काेराेनाबाधित आढळून आले आहेत. 
२३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. काेराेनाचे संकट कायम असतानाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, यासाठी शासनाने वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करताना विद्यार्थी काेराेनाबाधित हाेणार नाही, यासाठी पूर्ण खबरदारी शासनामार्फत घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षकांची काेराेना तपासणी केली जात आहे. शिक्षण विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांना शिकविणारे एकूण २ हजार ७५६ शिक्षक आहेत. यात जिल्हा परिषद, आश्रमशाळा, खासगी व्यवस्थापनाच्या शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा या शाळांमधील शिक्षकांचा समावेश आहे. 
गुरूवारपासून शिक्षकांची काेराेना तपासणीस सुरूवात झाली. शनिवारपर्यंत जवळपास ९०० शिक्षकांची काेराेना तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ३४ शिक्षक काेराेनाबाधित आढळून आले आहेत. या शिक्षकांना आता वर्गावर अध्यापनासाठी न पाठविता दवाखान्यात पाठविले जाणार आहे. विद्यार्थ्यांना संसर्ग हाेऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी शानामार्फत घेतली जात आहे. साेमवारपर्यंत  शिक्षकांची तपासणी पूर्ण  हाेईल. अर्ध्यापेक्षा अधिक शिक्षकांची तपासणी शिल्लक आहे. त्यामुळे काेराेनाबाधित शिक्षकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

११९ बाधितांची शनिवारी पडली भर
शनिवारी ११९ नवीन काेराेनाबाधितांची भर पडली आहे. ३८ जणांनी काेराेनावर मात केली आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील सीआरपीएफ १, आयटीआय चौक १, कॅम्प एरिया २, टेंभा २, अयाेध्यानगर १, तिरुपती कॉम्पलेक्स २, गोकुलनगर ८, लांजेडा १, आयटीआय बायपास मथुरानगर १, माैशिखांब १, गांधीवाॅर्ड १, स्नेहनगर १, पंचवटीनगर १, रामनगर २, गोगाव १, पोटेगाव १, राजगाटाचेक १, लालबहादुर विद्यालय जवळ डोंगरगाव १, राधे बिल्डींग जवळ २, इतर स्थानिक १६, इंदिरानगर १, मुरखळा १, येवली १, डीआयजी कार्यालय १, कारमेल स्कुलच्या मागे १, शिवाजी कॉलेजच्या मागे १, अयोध्यानगर १, कस्तुरबा वाॅर्ड १, बर्डी १, फुड लव्हर रेस्टॉरेंट धानोरा रोड १, कन्नमवार नगरातील एका काेराेनाबाधित रूग्णाचा समावेश आहे.

अहेरी तालुक्यातील बाधितांमध्ये आलापल्ली २, स्थानिक ३, नागेपल्ली २, आलापल्ली टिचर कॉलनी गोंड मोहल्ला १, आरमोरी तालुक्यातील स्थानिक‍ १, भामरागड तालुक्यातील  मन्नेराजाराम पीएचसी १, चामोर्शी तालुक्यातील स्थानिक ३, लखमापुर १, एमजेएफ स्कुल आष्टी १, आष्टी २, सोनापुर १, येनापुर १, धानोरा तालुक्यातील रांगी १, सोडे २, स्थानिक १, एटापल्ली तालुक्यातील उडेरा ३, डुम्मे १, घोटसुर २, कोरची तालुक्यातील स्थानिक १, कुरखेडा तालुक्यातील अंगारा ७, अरततोंडी २, गेवर्धा २, खामटोला १, घाटी १, उराडी १, मुलचेरा तालुक्यातील सुभाषग्राम १, विवेकानंदपुर १, सिरोंचा तालुक्यातील स्थानिक २, टेकाडा १, झेडपी शाळा १, तसेच देसाईगंज तालुक्यातील कोकडी २, तुकुम वाॅर्ड २, आमगाव १, गांधीवाॅर्ड २, बीएव्ही २, पीजीएच १, कोंढाळा १ असा समावेश आहे.

Web Title: 34 secondary teachers were found in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.