३४ उपकेंद्रांमध्ये होणार प्रसूती कक्ष
By admin | Published: May 20, 2014 11:37 PM2014-05-20T23:37:55+5:302014-05-20T23:37:55+5:30
एकात्मिक कृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३४ उपकेंद्रांमध्ये प्रसुती कक्षाची निर्मिती केली जाणार असून यासाठी जवळपास २ कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे. घरी प्रसूती करण्यामुळे बालमृत्यू
गडचिरोली : एकात्मिक कृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३४ उपकेंद्रांमध्ये प्रसुती कक्षाची निर्मिती केली जाणार असून यासाठी जवळपास २ कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे. घरी प्रसूती करण्यामुळे बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण जास्त होते. हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रसुती रूग्णालयातच करावी याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. याचा परिणाम म्हणजे मागील काही वर्षात रूग्णालयात प्रसूती होणार्या महिलांची संख्या वाढली आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश उपकेंद्रांमध्ये प्रसूतीची सुविधा नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जावे लागत होते. गडचिरोली जिल्ह्यात प्रवासाची साधने अत्यंत कमी आहेत. त्यामुळे गरोधर मातेला बैलबंडीमध्ये रूग्णालयापर्यंत घेऊन जावे लागते. प्रसूतीला उशीर झाल्याने माता किंवा नवजात बालकाचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यातील ३४ आरोग्य उपकेंद्रांमध्ये प्रसूती कक्षाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्या गेला आहे. यासाठी जवळपास २ कोटी रूपयाचा खर्च अपेक्षीत आहे. यामध्ये धानोरा तालुक्यातील जपतलाई, तुकुम, हेटी, साखेरा, चिचोडा, चामोर्शी तालुक्यातील मक्केपल्ली, बोरी, आमगाव, लक्ष्मणपूर, लखमापूर, नवेगाव रै., रेखेगाव, अहेरी तालुक्यातील आलापल्ली, नवेगाव, कन्नेपल्ली, पुसुकपल्ली, कारसपल्ली, आरमोरी तालुक्यातील सोनेरांगी, चामोर्शी, आष्टा, मुलचेरा तालुक्यातील कोपरअल्ली, सिरोंचा तालुक्यातील पुल्लीगुड्डम, अंकिसा चक, कोरची तालुक्यातील बेडगाव, गडचिरोली तालुक्यातील वसा, नगरी, मारोडा यांचा समावेश आहे. प्रत्येक प्रसूती कक्षाच्या बांधकामासाठी ५ लाख ९५ हजार रूपयाचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.