डिजिधनमध्ये ३४ हजार २०४ नवी खाती उघडली

By admin | Published: April 18, 2017 12:58 AM2017-04-18T00:58:11+5:302017-04-18T00:58:11+5:30

डिजिधन अंतर्गत २६ डिसेंबर २०१६ पासून आतापर्यंत ३४ हजार २०४ बँक खाते गडचिरोली जिल्ह्यात उघडण्यात आले आहे, ...

34 thousand 204 new accounts were opened in the district | डिजिधनमध्ये ३४ हजार २०४ नवी खाती उघडली

डिजिधनमध्ये ३४ हजार २०४ नवी खाती उघडली

Next

गडचिरोली : डिजिधन अंतर्गत २६ डिसेंबर २०१६ पासून आतापर्यंत ३४ हजार २०४ बँक खाते गडचिरोली जिल्ह्यात उघडण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी सोमवारी गडचिरोली येथे दिली.
जिल्ह्यात बँकांचे जाळे मर्यादित असले तरी मोठ्या प्रमाणावर रोख विरहित व्यवहार व्हावे, या दृष्टीकोनातून बँकांच्या मदतीने मेळावे घेण्यात येत आहेत. या मेळाव्यांमधून आतापर्यंत उघडण्यात आलेल्या ३४ हजार खात्याव्यतिरिक्त आधीच्या खात्यांचे आधार सिडींग अर्थात आधार क्रमांक जोडणीला प्राधान्य देण्यात आला आहे. या माध्यमातून आतापर्यंत ६८ हजार ५८ खात्यांशी आधार क्रमांक जोडण्यात आले, अशी माहिती नायक यांनी दिली. रोखविरहीत व्यवहाराचा महत्त्वाचा भाग म्हणून १ लाख २१ हजार ४७७ खात्यांना मोबाईल क्रमांकाची जोडणी या कालावधीत झाली आहे. तर ३६ हजार ६०३ बँक खातेदारांना एटीएम कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे. रोखविरहीत व्यवहार अधिक होण्याच्या माध्यमांपैकी पार्इंट आॅफ (पीओएस) मशीन होय. या कालावधीत नगर पालिका, नगर पंचायत तसेच खासगी आस्थापना यामध्ये १३४ पीओएस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व ग्रामपंचायतीमध्येही एक महिन्यात पीओएस मशीन उपलब्ध होणार आहे व या दृष्टीकोणातून प्रशिक्षण देण्याचेही काम आगामी काळात करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नायक यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)

जिल्ह्यात आतापर्यंत नेट बँकींग खाती ७ हजार ६०, भिम अ‍ॅप डाऊनलोड ३ हजार ९८३ आणि मोबाईल बँकींग ९ हजार ८४४ इतके अ‍ॅक्टीवेशन डिजिधन अंतर्गत पूर्ण झाले आहे. भिम रेफरल अंतर्गत विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांच्या प्राचार्यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

Web Title: 34 thousand 204 new accounts were opened in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.