३५ गावातील रोवणीचे काम बंद

By admin | Published: July 28, 2014 11:33 PM2014-07-28T23:33:25+5:302014-07-28T23:33:25+5:30

२८ जुलैपासून ते ३ आॅगस्टपर्यंत नक्षल सप्ताहादरम्यान बंद पाडण्याचे आवाहन नक्षल्यांनी बॅनर व पत्रकातून केले होते. आज २८ जुलै रोजी पहिल्या दिवशी तळोधी (मो.) परिसरातील ३० ते ३५ गावातील

35 work in the village is closed | ३५ गावातील रोवणीचे काम बंद

३५ गावातील रोवणीचे काम बंद

Next

दुर्गम भागात हीच स्थिती : नक्षल सप्ताहाचा परिणाम
तळोधी (मो.) : २८ जुलैपासून ते ३ आॅगस्टपर्यंत नक्षल सप्ताहादरम्यान बंद पाडण्याचे आवाहन नक्षल्यांनी बॅनर व पत्रकातून केले होते. आज २८ जुलै रोजी पहिल्या दिवशी तळोधी (मो.) परिसरातील ३० ते ३५ गावातील रोवणीचे काम बंद होते. तसेच एटापल्ली, कोरची आदी तालुक्यातील दुर्गम भागातही रोवणीचे काम बंद होते.
काही दिवसापूर्वी नक्षल सप्ताहादरम्यान रोवणीचे व इतर कामे बंद ठेवून नक्षल सप्ताह यशस्वी करण्याचे आवाहन नक्षल्यांनी भाडभिडी, येडानूर, पावीमुरांडा आदी परिसरात बॅनर लावून केले होते. तसेच यापरिसरात पत्रक टाकूनही नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन नक्षल्यांनी केले होते. दीड महिन्यानंतर संततधार पाऊस बरसल्याने तळोधी (मो.) परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात रोवणीचे काम जोमात सुरू केले होते. मात्र नक्षल सप्ताहादरम्यान शेतकऱ्यांना रोवणीची कामे बंद करावे लागले.
३० आॅगस्टपर्यंत या परिसरात रोवणीचे काम बंद राहणार असल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मिळाली. नक्षल सप्ताहादरम्यान रोवणीचे काम ठप्प पडले आहे. मात्र पुढील आठवड्यात पावसाने उसंत घेतल्यास अनेक शेतकऱ्यांची रोवणीची कामे खोळंबणार आहेत. यामुळे आदीच दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या नक्षल सप्ताहामुळे शेतकऱ्यांसमोर संकट कोसळले आहे. अशीच स्थिती कुरखेडा, अहेरी, भामरागड, कोरची, कसनसूर व आदी दुर्गम भागात असल्याची माहिती आहे. (वार्ताहर)

Web Title: 35 work in the village is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.