रबी शिवार फेरीत ३५० शेतकऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2017 02:18 AM2017-03-25T02:18:05+5:302017-03-25T02:18:05+5:30

कृषी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र व आत्मा, जिल्हा नाविन्यता परिषद, राष्ट्रीय

350 farmers participate in Rabi Shimar Round | रबी शिवार फेरीत ३५० शेतकऱ्यांचा सहभाग

रबी शिवार फेरीत ३५० शेतकऱ्यांचा सहभाग

Next

कृषी मेळावा : विविध पीक पद्धतीबाबत केले मार्गदर्शन; कृषी महाविद्यालयातील पिकांची पाहणी
गडचिरोली : कृषी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र व आत्मा, जिल्हा नाविन्यता परिषद, राष्ट्रीय केमिकल्स फर्टीलायझर्स लिमिटेड, महाबिज व व्हीसीएमएफ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी संशोधन केंद्र सोनापूर येथे कृषी मेळावा व रबी शिवार फेरीचे आयोजन २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते. या मेळाव्यादरम्यान जिल्हाभरातील ३५० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.
शिवार फेरीचे उद्घाटन आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनीय समारोहाला कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अमरशेट्टीवार, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे, आत्माच्या उपसंचालक प्रिती हिरडकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा चौधरी, बाबुराव सारवे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना डॉ. प्रकाश पवार यांनी शेतकऱ्यांचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी प्रचलित पीक पध्दतीत आमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी, असे झाल्यास शेती निश्चितच फायद्याची ठरेल. नवीन संकल्पना, नवीन तंत्रज्ञान वापरण्याचे कौशल्य शेतकऱ्यांनी आत्मसात केले पाहिजे, असे मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी बाबुराव सारवे यांनी सगुणा राईस पध्दतीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी नेहमी तत्पर राहतात. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन आवश्यक असल्यास त्यांनी प्रत्यक्ष कृषी केंद्रात येऊन सल्ला विचारावा, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. अमरशेट्टीवार, संचालन आर. डब्ल्यू. वाघमारे, आभार प्रा. डी. एन. अनोकार यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. सुधीर बोरकर, डॉ. मनोहर इंगोले, डॉ. शुभांगी अलेक्झांडर, डॉ. डी. टी. उंद्रतवाड, डॉ. एच. एफ राठोड यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

निवडक शेतकऱ्यांनाच बोलावल्याचा आरोप
कृषी विज्ञान केंद्रात विविध मेळावे व मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र या कार्यक्रमाला जिल्ह्यातील काही निवडकच शेतकऱ्यांना बोलाविले जाते. त्यामुळे या कार्यक्रमांचा लाभ काही निवडकच शेतकऱ्यांना मिळतो, असा एका प्रश्न शेतकऱ्याने उपस्थित केला. यावर प्रतिक्रिया देताना कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे यांनी प्रत्येक मेळावा आयोजनाची माहिती वृत्तपत्रातून दिली जाते. त्यामुळे निवडक शेतकऱ्यांना कार्यक्रमाला बोलविले जाते. हा आरोप चुकीचा असल्याचे सांगितले.

Web Title: 350 farmers participate in Rabi Shimar Round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.