३६ बसगाड्या मार्र्कं डा यात्रेच्या भाविकांना देणार सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2016 12:04 AM2016-02-11T00:04:58+5:302016-02-11T00:04:58+5:30

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कं डा येथे ७ मार्चपासून शिवरात्रीनिमित्त जत्रा भरणार आहे.

36 bus service will be provided to the pilgrims by Marcn Da Yagra | ३६ बसगाड्या मार्र्कं डा यात्रेच्या भाविकांना देणार सेवा

३६ बसगाड्या मार्र्कं डा यात्रेच्या भाविकांना देणार सेवा

Next

७ मार्चपासून यात्रेला प्रारंभ : गडचिरोली आगाराचे नियोजन जाहीर
चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कं डा येथे ७ मार्चपासून शिवरात्रीनिमित्त जत्रा भरणार आहे. या यात्राकाळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये या हेतूने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ‘यात्रा स्पेशल’ जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार ४ मार्च ते १२ मार्च या नऊ दिवसांच्या कालावधीत गडचिरोली आगारातर्फे ३६ बसगाड्या यात्रा स्पेशल म्हणून सोडण्यात येणार आहे.
महाशिवरात्रीनिमित्त श्री मार्कंडादेव यात्रेकरिता गडचिरोली आगाराने बसगाड्यांच्या व्यवस्थेसाठी गडचिरोली, चामोर्शी, व्याहाड खुर्द, व्याहाड बुज, सावली, मूल असे सहा नियंत्रण केंद्राची व्यवस्था केली आहे. गडचिरोली या नियंत्रण केंद्रातून मार्र्कं डासाठी १८ बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. चामोर्शी ते मार्र्कं डामार्गे ८, व्याहाड खुर्द ते साखरी घाट ३, व्याहाड बुज ते साखरी घाट १, सावली ते साखरी घाट मार्गे ३ व मूल ते मार्र्कंडामार्गे ३ बसगाड्या यात्रा स्पेशल म्हणून सोडण्यात येणार आहे.
याशिवाय ब्रह्मपुरी, राजुरा, अहेरी, चिमूर या बसस्थानकातून मार्र्कंडादेव यात्रेसाठी जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहे. विभाग नियंत्रक बोनसरे यांच्या मार्गदर्शनात व आगार व्यवस्थापक व्ही. एल. बावणे यांच्या नियंत्रणात यात्राकाळातील बस वाहतुकीचे नियोजन गडचिरोली बसस्थानकप्रमुख पी. आर. बासनवार, चामोर्शी बसस्थानक प्रमुख एस. ए. चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून प्रवाशांनी बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन या सर्वांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)

१३ कर्मचारी ठेवणार नियंत्रण
गडचिरोली आगाराच्या वतीने मार्र्कं डादेव यात्रा स्पेशल बसगाड्यांच्या वाहतुकीवर १३ नियंत्रण कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. गडचिरोली-मार्र्कं डा मार्गावरील वाहतुकीवर पाच, चामोर्शी व मार्र्कं डा मार्गाच्या वाहतुकीवर तीन, व्याहाड खुर्द ते साखरी घाट मार्गावर एक, सावली ते साखरी घाट तसेच मूल ते मार्र्कं डा मार्गावरील वाहतुकीवर प्रत्येकी दोन असे एकूण १३ कर्मचारी नियंत्रक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.

मार्र्कं डादेव व साखरी घाट येथे तात्पुरते बसस्थानक
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारामार्फत मार्र्कं डादेव यात्रेसाठी मार्र्कंडादेव व साखरी घाट येथे तात्पुरते बसस्थानक उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी अनुक्रमे २८ व ५ नियंत्रण कर्मचारी राहणार आहेत.

पाण्याची सुविधा राहणार
मार्र्कं डादेव व साखरी घाट या तात्पुरत्या बसस्थानकावर येणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मार्र्कं डादेव येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससाठी आवश्यक इंधन साठा, यांत्रिक व स्वच्छकाची व्यवस्था करण्यात येणार आहे. घोषणेसाठी लाऊडस्पिकर संचही लावण्यात येणार असून पेंडालची व्यवस्था करण्यात येणार आहे. अडचणीच्या वेळी मदत व्हावी म्हणूून फिरत्या पथकाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Web Title: 36 bus service will be provided to the pilgrims by Marcn Da Yagra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.