तीन तासांत ३६ मालवाहू वाहनांची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:36 AM2021-07-29T04:36:21+5:302021-07-29T04:36:21+5:30
वैरागड-कढाेली हा जिल्हा मार्ग आहे. छत्तीसगड ते आंध्र प्रदेश दरम्यान हाेणारी जड वाहतून कुरखेडा देसाईगंज ते आरमोरी या राज्य ...
वैरागड-कढाेली हा जिल्हा मार्ग आहे. छत्तीसगड ते आंध्र प्रदेश दरम्यान हाेणारी जड वाहतून कुरखेडा देसाईगंज ते आरमोरी या राज्य मार्गाने न होता, गोठणगाव फाटा ते ठाणेगाव व्हाया गडचिरोली होते. या सततच्या जड वाहतुकीमुळे एका वर्षाच्या अंतराने डांबरी रस्त्याची दुरुस्ती झाली, तरी रस्त्यावर अल्पावधीतच खड्डे पडतात. वैरागडपासून एक किमी अंतरावर बऱ्याच दिवसापासून खड्डा पडला होता. त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती न झाल्याने हा खड्डा अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे. कडोली वैरागड मार्गावरील या खड्ड्यात पंधरा दिवसांपूर्वी एका मालवाहू ट्रकचा अपघात झाला होता, हा अपघात इतका जबरदस्त होता की, ट्रॅक खड्ड्यात गेल्याबरोबर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून जवळच्या बोडीत ट्रक घुसला. रस्त्यालगत असलेल्या विद्युत जनित्राची फार मोठी हानी झाली. या ठिकाणी यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघातही झाले. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष द्यायला तयार नव्हते. या पूर्वी या ठिकाणी असलेला छोटा सीडीवर्क सुव्यवस्थित असतानाही नवीन बांधकाम करून, त्या ठिकाणी मुरुम गिट्टीचा योग्य थर न दिल्यामुळे मागच्या वर्षापासून पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी खड्डा पडत आहे, त्याची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.