पशुधन योजनांवरील खर्चात ३६ लाखांचा गैरव्यवहार

By admin | Published: July 31, 2014 12:01 AM2014-07-31T00:01:27+5:302014-07-31T00:01:27+5:30

चामोर्शी पंचायत समितींतर्गत पशुधन विभागातर्फे राबविण्यात आललेल्या योजनांवर लाखो रूपयाचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित विभागाच्या खर्चाला पं.स. सदस्यांनी मान्यता दिली नाही.

36 lakhs of fraud on the cost of livestock schemes | पशुधन योजनांवरील खर्चात ३६ लाखांचा गैरव्यवहार

पशुधन योजनांवरील खर्चात ३६ लाखांचा गैरव्यवहार

Next

चामोर्शी : चामोर्शी पंचायत समितींतर्गत पशुधन विभागातर्फे राबविण्यात आललेल्या योजनांवर लाखो रूपयाचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित विभागाच्या खर्चाला पं.स. सदस्यांनी मान्यता दिली नाही. तर उलट संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली असल्याने खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार मे, जून २०१४ या अल्पावधीत पशुधन विकास अधिकारी (विस्तार) भोयर यांनी २०१३-१४ या वर्षातील प्राप्त निधी व खर्चाचा अहवाल सादर केला असता, त्या अहवालात प्रत्यक्ष खर्च व दाखविलेली माहिती यात मोठा गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे. अहवालानुसार टी.एस.पी. शेळीगट, ओटीएसपी शेळी गट, एसीपी दुधाळ जनावर गट, एनटीएस कुकुट गट, ओटीएसपी तलंगा गट, एसपी दुधाळ जनावरे, खाद्य वाटप व कामधेनू अंतर्गत पशुपालक मंडळ स्थापन व सहल, वैरण विकास कार्यक्रम, निकृष्ठ चारा सकस करणे, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, जनावरांचे मलमूत्र व खत व्यवस्थापन तसेच जीवनसत्व खरेदी, खनिजमिश्रण खरेदी, जिल्हा निधी बियाणे, एफएमडी अशा विविध योजनांवर ४० लाख ७५ हजार ०४० रूपयाचा निधी प्राप्त झाला. त्यापैकी ३६ लाख ५१ हजार ३३७ रूपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. परंतु या खर्चात प्रचंड गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्याने पं.स. सभागृहाने सदर खर्च फेटाळून लावला व चौकशी समिती नेमण्याचा ठराव पारित करण्यात आला. यातील अनेक योजना राबविल्याच नाही. तर काही योजनांवर कमी खर्च करून अमाप पैसा खर्च दाखविण्यात आला आहे.

Web Title: 36 lakhs of fraud on the cost of livestock schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.