कुरूड येथे ३७ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:38 AM2021-04-04T04:38:04+5:302021-04-04T04:38:04+5:30
जयंतीचे औचित्य साधून समृद्धी फाऊंडेशन कुरूड तथा नि:शुल्क रक्त सेवा समितीच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर घेण्यात आले. सर्वप्रथम ...
जयंतीचे औचित्य साधून समृद्धी फाऊंडेशन कुरूड तथा नि:शुल्क रक्त सेवा समितीच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर घेण्यात आले. सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कुरूडच्या प्रथम नागरिक सरपंच प्रशाला अविनाश गेडाम यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली. यावेळी समृद्धी फाऊंडेशनच्या ३७ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी सरपंच प्रशाला गेडाम, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण शेडमाके, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, चारुदत्त राऊत, डाॅ. अंजली साखरे, सतीश तडलकावार, नरेश कंदकुरीवार, सूरज चांदेकर, मुरलीधर पद्दीवार, जीवन गेडाम, औषध निर्माण अधिकारी गिरीधर ठाकरे, समृद्धी फाऊंडेशनचे प्रदीप वरंभे, संदीप नाहाले, आशिष नाहाले, अखिल मिसार, रमेश ढोरे, राजकुमार ढोरे, पंकज मिसार, प्रफुल आठवले, रोशन नाहाले, नीतेश दोनाडकर, मच्छिंद्र ढोरे, चक्रधर आठवले, निशांत ठाकरे, शुभम पारधी, तुषार ठाकरे, चेतन पारधी, टिमेश्वर ठाकरे, हिरालाल मैद, श्रीकांत आठवले, संजय राऊत, पंकज तोंडरे, समीर राऊत, नेपाल उरकुडे व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.