आरमोरी विधानसभा क्षेत्रात आमदार निधीतून ३७.५० लाखांची कामे मंजूर

By admin | Published: August 8, 2015 01:40 AM2015-08-08T01:40:22+5:302015-08-08T01:40:22+5:30

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी २०१४-१५ या वर्षात आपल्या स्थानिक विकास निधीतून ३७.५० लक्ष रूपयांचे काम मंजूर केले आहे.

37.50 lakhs works are sanctioned from MLA fund in Armori assembly area | आरमोरी विधानसभा क्षेत्रात आमदार निधीतून ३७.५० लाखांची कामे मंजूर

आरमोरी विधानसभा क्षेत्रात आमदार निधीतून ३७.५० लाखांची कामे मंजूर

Next

आरमोरी : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी २०१४-१५ या वर्षात आपल्या स्थानिक विकास निधीतून ३७.५० लक्ष रूपयांचे काम मंजूर केले आहे. त्यांनी एकूण १० कामे या वर्षात मंजूर केले आहे. यामध्ये पोटगाव येथील पुंडलिक दडमल ते शंकर रणदिवे यांच्या घरापर्यंत सीसी रोडचे बांधकाम (२.८९ लक्ष), कासवी येथे सभामंडप बांधकाम ३.९३ लक्ष, सायगाव येथे शंकर मंदिराजवळ सभामंडप बांधकाम (३.९४ लक्ष), मोहगाव येथे बेलुराम दुधा लड्डर ते चैनसिंग भैसा यांचे घरापर्यंत सीसी रोडचे बांधकाम (२.९७ लक्ष), कोचिनारा येथे रंगमंचाचे बांधकाम (४ लक्ष), बेळगाव येथे खुल्या सभामंडपाचे बांधकाम (३.९४ लक्ष), मसेली येथे सभामंडपाचे बांधकाम (४.०९ लक्ष), गोठणगाव येथे सभामंडपाचे बांधकाम (३.९३ लक्ष), नवरगाव (आंधळी) येथे सभामंडपाचे बांधकाम करणे (३.९२ लक्ष), वाकडी (मोहगाव) येथे सभामंडपाचे बांधकाम करणे (३.८९ लक्ष) असे दहा कामे प्रस्तावित/मंजूर केले आहे. या कामावर ३७.५० लक्ष रूपयांचा निधी खर्च होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
आरमोरी क्षेत्रात अशोक नेते यांचे काम
खासदार अशोक नेते यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्रात जोगीसाखरा येथील महादेव राऊत यांच्या किराणा दुकानापासून ते घरापर्यंत सीसी रोड (२.९८ लक्ष), देलनवाडी येथे दादाजी साखरे ते देवराव घरत यांच्या घरापर्यंत सीसी रोडचे बांधकाम (२.९८ लक्ष), वडधा येथे रामदास पगाडे ते विजय खेवले यांच्या घरापर्यंत सीसी रोडचे बांधकाम (३ लक्ष), ठाणेगाव येथे सीसी रोडचे बांधकाम (२.८७ लक्ष), कुरखेडा येथील श्रीरामनगर येथे राम लांजेवार यांच्या घरापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत सीसी रोडचे बांधकाम (४.८१ लक्ष), चिखली येथे अंतर्गत सीसी रोडचे बांधकाम (२.८९ लक्ष), आमगाव येथे खडीकरण (१.९२ लक्ष), आमगाव येथे सीसी रोड बांधकाम (३.८६ लक्ष), बोडधा सीसी रोडचे बांधकाम (३.८६ लक्ष), विसोरा येथे सभामंडपाचे (२.९९ लक्ष) ही कामे मंजूर करण्यात आली आहे.

Web Title: 37.50 lakhs works are sanctioned from MLA fund in Armori assembly area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.