लोकन्यायालयात ३८ प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:17 AM2018-04-23T00:17:51+5:302018-04-23T00:17:51+5:30
जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी रविवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत २४ लाख ८ हजार ९३० रूपयाचे १४ प्रलंबित प्रकरणे.....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी रविवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत २४ लाख ८ हजार ९३० रूपयाचे १४ प्रलंबित प्रकरणे तसेच ३१ लाख २७ हजार ४३० रूपयांची २४ दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण ५५ लाख ३६ हजार ३६० रूपयांची ३८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
सदर लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीचे अध्यक्ष संजय ग. मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांच्या नियंत्रणाखाली व देखरेखीखाली करण्यात आले होते. या लोकअदालतील पॅनल क्रमांक १ चे पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एम. पदवाड यांनी काम पाहिले. पॅनल क्रमांक २ चे पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) बी. एम. पाटील यांनी तर पॅनल क्रमांक ३ चे पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी एन. सी. बोळफळकर यांनी काम पाहिले.
या राष्टÑीय लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी वकील मंडळी व न्यायालयातील कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणासाठी राष्टÑीय लोक अदालत घेण्यात आली.