३८ मुख्याध्यापकांवर कारवाई?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 09:54 PM2018-07-29T21:54:01+5:302018-07-29T22:11:11+5:30

राज्यात ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीत शाळांमध्ये विशेष पटपडताळणी मोहिम राबविली. यात जिल्ह्यातील ३८ शाळांमध्ये बोगस विद्यार्थी आढळले.

38 Headmasters take action? | ३८ मुख्याध्यापकांवर कारवाई?

३८ मुख्याध्यापकांवर कारवाई?

Next
ठळक मुद्देखळबळ : २०११ मधील पटपडताळणीमध्ये आढळली कमी उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यात ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीत शाळांमध्ये विशेष पटपडताळणी मोहिम राबविली. यात जिल्ह्यातील ३८ शाळांमध्ये बोगस विद्यार्थी आढळले. या शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापकांविरोधात फौजदारी कारवाईचे निर्देश शिक्षण संचालक सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
बोगस विद्यार्थी दाखवून शासकीय योजनांचा लाभ घेतला जात असल्याची बाब शासनाच्या लक्षात आली होती. त्यामुळे बोगस विद्यार्थी शोधमोहीम राज्यभरात करण्यात आली. या शोधमोहिमेदरम्यान राज्यातील १ हजार ४०४ शाळांनी बोगस विद्यार्थी दाखविल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ३८ शाळांचा समावेश आहे. दोषी शाळांविरोधात कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार कारवाई न झाल्याने २०१४ मध्ये अवमान याचिका दाखल झाली होती. त्याची दखल घेत फौजदारी कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार शिक्षण विभागाचे संचालक सुनिल चव्हाण यांनी २६ जुलै रोजी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकामध्ये संबंधित शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. यानुसार शिक्षणाधिकारी कोणती कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
या शाळांच्या तत्कालीन मुख्याध्यापकांवर होणार कारवाई
गडचिरोली जिल्ह्यातील जि.प. शाळा व्यंकटापूर, लंकाचेन, नैनेर, असरा, मंगेवाडा टोला, कुरूमपल्ली, कोत्तगुडम, तोंडेर, दरभा, रेंगावाही, वांगेतुरी, मरीगड्डम, पल्ली, गोरनूर, तोडक, रोपीनगट्टा टोला, लेकुरबोडी, ताडगुडा, पिडीगुडम, हालोदांडी, भटपर, मयालघाट, मेंढरी, अंडगेपल्ली, सुरगाव, रायगुडम, भेंडीकन्हार, किष्टापूर मसाद, कसनसूर खुर्द, गहुबोडी, वेलमागड, पेरकाभट्टी, बामणपल्ली, कोसफुंडी, इरूकडुम्मे, पुन्नुर या जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. तसेच सिरोंचा येथील एफसीडी उच्च प्राथमिक शाळा, पुनागुडम येथील राजे धर्मराव प्राथमिक शाळा या शाळांचा कारवाईस पात्र शाळांमध्ये समावेश आहे.

Web Title: 38 Headmasters take action?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.