जिल्ह्यात ७ मृत्यूसह ३८५ नवीन कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:37 AM2021-05-13T04:37:16+5:302021-05-13T04:37:16+5:30
गडचिरोली जिल्ह्यात दिवसभरात २२८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित २६,३६९ पैकी ...
गडचिरोली जिल्ह्यात दिवसभरात २२८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित २६,३६९ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २२,००२ वर पोहोचली, तसेच सध्या ३,७९२ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ५७५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज ७ नवीन मृत्यूंमध्ये ता. भामरागड, जि. गडचिरोली येथील ५३ वर्षीय पुरुष, ता. अहेरी, जि. गडचिरोली येथील ६२ वर्षीय महिला, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली येथील ६५ वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील २८ वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथील ५३ वर्षीय पुरुष, ता. अहेरी, जि. गडचिरोली येथील ५५ वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली येथील ५८ वर्षीय पुरुष यांचा नवीन मृतांमध्ये समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.४४ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण १४.३८ टक्के, तर मृत्यूदर २.१८ टक्के झाला.
नवीन ३८५ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ९६, अहेरी तालुक्यातील ५३, आरमोरी १७, भामरागड तालुक्यातील ६, चामोर्शी तालुक्यातील ६६, धानोरा तालुक्यातील २१, एटापल्ली तालुक्यातील १३, कोरची तालुक्यातील ९, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये १८, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये १४, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये २०, तर वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये ५२ जणांचा समावेश आहे, तर आज कोरोनामुक्त झालेल्या २२८ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १२३, अहेरी १३, आरमोरी १२, भामरागड २, चामोर्शी १३, धानोरा ५, एटापल्ली ३, मुलचेरा ४, सिरोंचा ३७, कोरची ३, कुरखेडा ३, तसेच वडसा येथील १० जणांचा समावेश आहे.