३९ लाखांचा दारूसाठा जप्त
By admin | Published: June 9, 2017 01:10 AM2017-06-09T01:10:04+5:302017-06-09T01:10:04+5:30
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आष्टी पोलिसांनी बुधवारी सापळा रचून वन विभागाच्या नाक्याजवळ एका चारचाकी
चारचाकी वाहन पकडले : दोन दारू विक्रेत्यांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आष्टी पोलिसांनी बुधवारी सापळा रचून वन विभागाच्या नाक्याजवळ एका चारचाकी वाहनासह ३९ लाख रूपयांचा दारूसाठा पकडला.
याप्रकरणी पोलिसांनी हरीदास उर्फ अमित लक्ष्मण गोतपर्तीवार रा. जयरामपूर व सुधीर अवधरे रा. खराडपेठ या दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याच्या तारखेपासून अमित गोतपर्तीवार हा फरार होता. त्याच्याकडून रोख ९९ हजार रूपये व दोन मोबाईल संच जप्त करण्यात आले. सुधीर अवधरे याला अटक केल्यानंतर त्याचेकडून सात लाख रूपये किमतीचे वाहन व तीन मोबाईल जप्त करण्यात आले. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनात आष्टीचे पोलीस निरिक्षक दीपक लुकडे, पोलीस उपनिरिक्षक संदीप कापडे, संदीप सिंगटे, सहायक फौजदार संजय गोंगले, उसेंडी, खेडकर, येलावार आदींनी केली.