पेरमिली भागात ३-जी इंटरनेट सेवा कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:48 AM2021-06-16T04:48:15+5:302021-06-16T04:48:15+5:30
पेरमिली येथे बीएसएनएलचे मोबाईल टॉवर आहे. परिसरात २० ते २५ गावांचा समावेश आहे. त्या मानाने बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या बऱ्याच ...
पेरमिली येथे बीएसएनएलचे मोबाईल टॉवर आहे. परिसरात २० ते २५ गावांचा समावेश आहे. त्या मानाने बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या बऱ्याच प्रमाणात आहे. सध्या ग्राहकांकडे अॅन्ड्राॅईड मोबाईल असल्याने अनेक जण मोबाईलवर अनेक ऑनलाईन कामे करतात. अनेक खासगी कंपन्यांची फोर-जी सेवा या भागात मिळत असली तरी बीएसएनएलची थ्री-जी सेवा नावापुरतीच आहे. टू-जीची स्पिडसुद्धा ग्राहकांना मिळत नसल्याने ते असमाधानीत आहेत. ऑनलाईन शॉपिंग, बँकिंग तसेच अन्य कामासाठी मोबाईल इंटरनेटची स्पिड आवश्यक प्रमाणात असणे गरजेचे आहे. मात्र मागील १५ दिवसांपासून या भागातील इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. तसेच मंद गतीने सुरू असल्याने ऑनलाईन कामांमध्ये अडचणी येत आहेत. याबाबत संबंधित विभागाचे अधिकारीसुद्धा अनभिज्ञ असल्याचा आव करून दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पेरमिली येथील थ्री-जी इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.