४ हजार ९८७ विद्यार्थी देणार नवोदयची परीक्षा
By admin | Published: January 7, 2017 01:36 AM2017-01-07T01:36:08+5:302017-01-07T01:36:08+5:30
जिल्ह्यात २०१६-१७ या शैक्षणिक सत्रात ४ हजार ९८७ विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी प्रवेश परीक्षा देणार आहेत.
जिल्हाभर २३ केंद्र : रविवारी परीक्षेचे आयोजन
गडचिरोली : जिल्ह्यात २०१६-१७ या शैक्षणिक सत्रात ४ हजार ९८७ विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी प्रवेश परीक्षा देणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील बाराही तालुक्यात २३ केंद्र देण्यात आले असून ८ जानेवारी रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजतापर्यंत ही परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती नवोदय विद्यालयाचे प्राचार्य कोटय्या, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी चव्हाण, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक विराज खराटे यांनी दिली.
चालू शैक्षणिक सत्रात ८ जानेवारी रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यावर्षी ४०० विद्यार्थ्यांची वाढ झाली असून ३२ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात पाच परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. तसेच अहेरीत तीन, गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, धानोरा, सिरोंचा तालुक्यात प्रत्येकी दोन तर एटापल्ली, देसाईगंज, कोरची, भामरागड व मूलचेरा तालुक्यात प्रत्येकी एक परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. यातील गडचिरोलीतील परीक्षा केंद्रावरून ८८२, आरमोरीत ४६०, कुरखेडात ३९२, धानोरात २८१, एटापल्लीत २०८, सिरोंचात २६५, अहेरी ४११, चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक १ हजार १०९, कोरचीत २७०, भामरागड १४९ व मुलचेरा तालुक्यातून २४९ विद्यार्थी नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा देणार आहेत. नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी व बारावीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. यात सर्वच शाळातील विद्यार्थी भाग घेतात.