बियाणांचा ४0 टक्के पुरवठा
By admin | Published: May 29, 2014 02:18 AM2014-05-29T02:18:15+5:302014-05-29T02:18:15+5:30
पाऊस पडताच शेतीच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे कृषी विभाग व शेतकरी वर्गाने ..
गडचिरोली : पाऊस पडताच शेतीच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे कृषी विभाग व शेतकरी वर्गाने बियाणे व खतांची जुळवाजुळव करण्यास सुरूवात केली असून सध्यास्थितीत एकूण मागणीच्या ४0 टक्के बियाणे उपलब्ध झाले आहेत. प्रत्यक्ष बियाणे पेरणीला आणखी १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत शेतकर्यांना आवश्यक तेवढे बियाणे उपलब्ध होईल, असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. काही वर्षापूर्वी शेतकरी वर्ग परंपरागत बियाणांचा वापर करीत होता. या बियाणांची उगवण क्षमता कमी राहत असल्याने बियाणांचा वापर जास्त करावा लागत होता. त्याचबरोबर या बियाणांमुळे उत्पादन वाढीस र्मयादा पडत होत्या. इतर क्षेत्राप्रमाणेच कृषी क्षेत्रातही संशोधन झाले. यामध्ये संकरीत वाणांचा शोध लावण्यात आला. जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते. चालू खरीप हंगामात १ लाख ६५ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाणार आहे. एकूण उत्पादनात धान पिकाचा वाटा ८0 टक्केपेक्षाही जास्त आहे. चालू खरीप हंगामासाठी २५ हजार ७४0 क्विंटल बियाणांची गरज भासणार आहे. सध्यास्थितीत ११ हजार ४८२.३0 क्विंटल धान पिकाचे बियाणे उपलब्ध झाले आहे. धान पिकाचे पर्हे टाकण्यासाठी आणखी १५ ते २0 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत उर्वरीत बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे यावर्षी बियाणांची टंचाई भासणार नाही. यातून निर्माण होणारा काळाबाजारही थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्या सोयाबिन या पिकाच्या पेर्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सदर पीक मध्यम व कोरडवाहू जमीनीमध्ये घेता येत असल्याने दरवर्षी या पिकाखालील क्षेत्र वाढत असल्याचे दिसून येते. धान पिकाच्या लागवडीपेक्षा सोयाबिन पिकाच्या लागवडीचा खर्च अत्यंत कमी आहे. एकदा पेरणी केल्यानंतर या पिकाची फारशी काळजी घेण्याची गरज राहत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग या पिकाकडे वळत चालला आहे. त्याचबरोबर जी जमीन आजपर्यंत पडीत होती. अशा जमीनीत सोयाबिनचे उत्पादन घेतले जात आहेत. चालू खरीप हंगामात ४ हजार ३५0 हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी १ हजार ९५७ क्विंटल बियाणांची गरज भासणार आहे. त्यापैकी ५७.६0 क्विंटल बियाणे उपलब्ध झाली आहेत. उर्वरीत बियाणे पाऊस पडेपर्यंत उपलब्ध होतील, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे. सोयाबिन पिकानंतर तूर, कापूस, मका, उडीद याही पिकांचे जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यासाठीसुध्दा आवश्यक असलेले बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (नगर प्रतिनिधी)