अहेरीत ४० जवानांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:32 AM2021-02-15T04:32:27+5:302021-02-15T04:32:27+5:30
अहेरी : जम्मू काश्मीरमध्ये १४ फेब्रुवारी २०१९ रोजी दहशतवाद्यानी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या व्हॅनला आत्मघाती हल्ला घडवून आणला. या ...
अहेरी : जम्मू काश्मीरमध्ये १४ फेब्रुवारी २०१९ रोजी दहशतवाद्यानी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या व्हॅनला आत्मघाती हल्ला घडवून आणला. या घटनेत सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. पुलवामा येथील ४० जवानांना रक्तदान करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विशेष म्हणजे, सीआरपीएफ बटालियन ९ व ३७ च्या मिळून एकूण ४० जवानांनी शिबिरात रक्तदान केले.
यावेळी सीआरपीएफ बटालियन ९ चे कमांडट आर. एस. बालापूरकर यांनी शहिदांच्या स्मारकाला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. सीआरपीएच्या जवानांनी देशात अनेक ठिकाणी अतिदुर्गम क्षेत्रातील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सिव्हीक्स ॲक्शन कार्यक्रम आयोजित करत आहेत. अहेरी उपजिल्हा रुग्णालयात रक्ताची कमी असल्यास वेळोवेळी रक्तदान शिबिर आयोजित करीत असतात. यामध्ये सीआरपीएफचे अधिकारी व उपकमांडटसह अहेरी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले.
यावेळी ९ बटालियनचे कमांडट आर. एस. बालापूरकर, द्वितीय कमान अधिकारी राकेश श्रीवास्तव, प्रभारी कमांडंट अमित सांगवान, ३७ बटालियनचे उपकमांडट रमेश डांगी, राजेंद्र सिंह, बीसी राय, ब्रजेंद्र कुमार, डॉ. संपत कुमार, निशांत गोस्वामी, डॉ. अरविंद कुमार उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील चम्मू डॉ प्रतिभा पेंदोर, रक्तपेडी तंत्रज्ञ सरिता वाघ, निखिल कोंडापर्ती, वेंकटस्वामी तोटावार, स्मिता सोनवणे, नेरोश्री मुंजम, वाहन चालक शरद बांबोडे यांनी सहकार्य केले.
बाॅक्स ....
गडचिराेलीतही अधिकाऱ्यांनी केले रक्तदान
सीआरपीएफ बटालियन १९२ च्यावतीने रविवारी रक्तदान शिबिर आयाेजित करून पुलवामा घटनेतील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अधिकारी व जवान मिळून ४० जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जाेपासली. यावेळी बटालियनचे कमांडंट जियाऊ सिंह, द्वितीय कमान अधिकारी जे. एस. शेखावत, उपकमांडंट संध्या राणी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय डाॅ. शिवशंकर राठाेड, डाॅ. वंदना पेद्दीवार आदींसह जवान व कर्मचारी उपस्थित हाेते.