४० आदिवासी विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकणार खाणीचे तंत्र, लॉयड मेटल्स उचलणार खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 11:34 AM2023-08-17T11:34:42+5:302023-08-17T11:35:37+5:30

प्रकल्पातच मिळेल नाेकरी

40 tribal students to study mining techniques in Australia, Lloyd Metals will bear the cost | ४० आदिवासी विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकणार खाणीचे तंत्र, लॉयड मेटल्स उचलणार खर्च

४० आदिवासी विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकणार खाणीचे तंत्र, लॉयड मेटल्स उचलणार खर्च

googlenewsNext

गडचिराेली : खाण क्षेत्राशी संबंधित नवे तंत्रज्ञान शिकण्यासाठी येत्या काही दिवसात ४० आदिवासी विद्यार्थी ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. तीन वर्षांच्या पदवीनंतर या विद्यार्थ्यांना लॉयड मेटल्समध्येच काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती ‘लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी दिली.

बी. प्रभाकरन यांनी सांगितले की, सुरजागड लोहप्रकल्प गडचिरोलीचा कायापालट करणारा प्रकल्प ठरणार आहे. १९६० साली टाटासारख्या कंपनीला परवानगी मिळूनही पायाभूत सुविधांअभावी टेकडीवर लोहखनिज उत्खनन करता आले नाही. ६० वर्षांनी का होईना अखेर येथे खनिज उत्खनन सुरळीत सुरू झाले. यामुळे येत्या काही दिवसात गडचिरोलीसह महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास प्रभाकरन यांनी व्यक्त केला.

सुरुवातीला नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे आम्हाला खाणीत कामाकरिता लोक मिळणे कठीण होते. पोलिस विभागाने दिलेल्या सुरक्षेच्या हमीमुळे आज आम्हाला काम पाहिजे म्हणून आसपासच्या गावातील शेकडो नागरिक खाणीवर येतात. स्थानिकांच्या सहमतीशिवाय आम्ही येथे कोणतेही काम करणार नाही. तीन दशलक्ष टनांवरून १० दशलक्ष टनांची परवानगी मिळालेली आहे. दुसरीकडे कोनसरी येथे कारखान्याचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे.

सध्या अडीच हजार कोटींची गुंतवणूक यात करण्यात आली असून, ती २० हजार कोटींपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात कोनसरी येथेच लोह उत्पादन घेण्याचा आमचा मानस आहे. यामुळे तब्बल २० हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. केवळ इतकेच नव्हे तर सध्या खाणीत कामाकरिता लागणारे प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी टेकडीवरच केंद्र उभारण्यात आले आहे. यातून स्थानिक युवकांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यात येत आहे.

मायनिंग कॉरिडॉर झाल्यास वाहतुकीची समस्या सुटेल

भविष्यात प्रभावित क्षेत्रातील जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळण्यास मदत होईल. प्रस्तावित ‘खाणपट्टा’ (मायनिंग कॉरिडॉर) पूर्ण झाल्यास येथील नागरिकांची वाहतुकीमुळे होणाऱ्या जाचातून सुटका होणार आहे, असेही प्रभाकरन यांनी यावेळी सांगितले.

‘ऑस्ट्रेलिया’तील कॅम्पस गडचिरोलीत आणणार

खाण क्षेत्रात गतीने काम करण्यासाठी लागणारे शिक्षण सध्या आपल्या देशात उपलब्ध नाही. त्यासाठी सध्या ४० स्थानिक विद्यार्थी आम्ही ऑस्ट्रेलियातील कर्टन विद्यापीठात पाठवत आहाेत. भविष्यात शासनाने परवानगी दिल्यास सामंजस्य कराराद्वारे गडचिरोली येथे कर्टन विद्यापीठाचे कॅम्पस चालू करू शकतो. त्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे प्रभाकरन यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: 40 tribal students to study mining techniques in Australia, Lloyd Metals will bear the cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.