चामोर्शी तालुक्यात ४०० शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:26 AM2021-06-03T04:26:25+5:302021-06-03T04:26:25+5:30
येनापूरच्या महावितरण कार्यालयाकडे परिसरातील जवळपास ४०० शेतकऱ्यांनी शेतातील वीज जोडणीसाठी एप्रिल २०१८ पासून अर्ज केले. त्यानंतर शेतकरी वारंवार जाऊन ...
येनापूरच्या महावितरण कार्यालयाकडे परिसरातील जवळपास ४०० शेतकऱ्यांनी शेतातील वीज जोडणीसाठी एप्रिल २०१८ पासून अर्ज केले. त्यानंतर शेतकरी वारंवार जाऊन विचारणा करू लागले. मात्र लॉकडाऊनचे कारण सांगून शेतकऱ्यांना आल्या पावली परत पाठविले जात आहे.
(बॉक्स)
उत्पन्नावर परिणाम
या परिसरात कोरडवाहू जमिनीत कपाशी पिकांसोबत, भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र शेतातील पिकाला पाणी देण्याची सोय उपलब्ध नसल्याने अनेक शेतकरी पीक लागवड करूनही अपेक्षित उत्पन्न घेऊ शकत नाही. महावितरण कंपनीने याची तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी निखाडे व जक्कूलवार यांनी केली आहे.
(बॉक्स)
धरण उशारा, कोरड घशाला
आज दोन वर्षे झाली तरी अजूनही वीज जोडणी झाली नसल्याने शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही परिस्थिती केवळ येनापूर परिसरातील नाही तर संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. एकीकडे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी व त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र वीज कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांना शेतातील विहीर व बोअरवेलमधील पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करता येत नाही. त्यामुळे 'धरण उशाला, कोरड घशाला' अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.