अरसाेडा जंगलात ४०० किलो मोहसडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:25 AM2021-07-02T04:25:31+5:302021-07-02T04:25:31+5:30
तालुका मुख्यालयापासून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेल्या अरसोडा गावात अवैध दारूची विक्री केली जाते. यामुळे परिसरातील गावकरी त्रस्त आहेत. ...
तालुका मुख्यालयापासून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेल्या अरसोडा गावात अवैध दारूची विक्री केली जाते. यामुळे परिसरातील गावकरी त्रस्त आहेत. अरसोडा जंगल परिसरात गावातील विक्रेत्यांनी दारू अड्डे व मोहसडवा टाकून ठेवला असल्याची माहिती मुक्तिपथ तालुका चमूला मिळाली. याबाबत आरएफओ यांना कळविताच त्यांनी वनरक्षक दोनाडकर यांना दारू अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार वनरक्षक दोनाडकर, वन मजूर व मुक्तिपथ तालुका चमूने जंगल परिसरात शोधमोहीम राबविली. दरम्यान, दोन ठिकाणी १० चुंगळ्यांमध्ये टाकून असलेला जवळपास ४०० किलो मोहसडवा व दारू गाळण्याचे साहित्य आढळून आले. संपूर्ण सडवा व साहित्य घटनास्थळावर नष्ट करण्यात आला. यावेळी गाव संघटनेचे सचिव उपस्थित होते.
010721\01gad_3_01072021_30.jpg
माेहफूल सडवा नष्ट करताना मुक्तिपथ चमू व वन कर्मचारी.