४१ कोरोनामुक्त तर ७८ नवीन बाधितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 05:00 AM2020-11-19T05:00:00+5:302020-11-19T05:00:19+5:30

दिवाळीच्या पूर्वीपासून थंडी सुरू झाल्याने अनेकांना सर्दी, पडसे व खाेकल्याचा त्रास हाेऊ लागला, अचानक वातावरणात बदल झाल्याने काही नागरिकांचे तापमान वाढू लागले. मात्र काेराेना चाचणी करण्यासाठी काही नागरिक पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. दरवर्षीच्या हिवाळ्यात सर्दी, खाेकला, अंगदुखी आदी त्रास हाेत असल्याचा अनुभव पाहून नागरिक खासगी डाॅक्टरांकडे जाऊन औषधाेपचार घेत आहेत.

41 corona free and 78 new victims registered | ४१ कोरोनामुक्त तर ७८ नवीन बाधितांची नोंद

४१ कोरोनामुक्त तर ७८ नवीन बाधितांची नोंद

Next
ठळक मुद्देआतापर्यंत ६५१० जणांनी केली कोरोनावर मात, केवळ ४६६ रुग्ण बाकी

  लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात बुधवारी ७८ नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तर ४१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ७०४९ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६५१० वर पोहचली आहे. सध्या ४६६ क्रियाशिल कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. 
आतापर्यंत जिल्ह्यात ७३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३५ टक्के, क्रियाशिल रूग्णांचे प्रमाण ६.६१ टक्के तर मृत्यूदर १.०४ टक्के झाला आहे. 
नवीन ७८ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ४२, अहेरी २०, भामरागड ४, चामोर्शी ५, एटापल्ली ४, मुलचेरा १, सिरोंचा १ आणि देसाईगंज येथील एका जणाचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ४१ रूग्णांमध्ये गडचिरोली २६, अहेरी १, आरमोरी ५, चामोर्शी ४, एटापल्ली १, कुरखेडा २ आणि देसाईगंजमधील २ जणांचा समावेश आहे.

काेराेना चाचणी करणाऱ्यांची संख्या घसरली
दिवाळीच्या पूर्वीपासून थंडी सुरू झाल्याने अनेकांना सर्दी, पडसे व खाेकल्याचा त्रास हाेऊ लागला, अचानक वातावरणात बदल झाल्याने काही नागरिकांचे तापमान वाढू लागले. मात्र काेराेना चाचणी करण्यासाठी काही नागरिक पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. दरवर्षीच्या हिवाळ्यात सर्दी, खाेकला, अंगदुखी आदी त्रास हाेत असल्याचा अनुभव पाहून नागरिक खासगी डाॅक्टरांकडे जाऊन औषधाेपचार घेत आहेत. गेल्या १५ ते २० दिवसांपासून काेराेनाची ॲन्टीजन व आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी बाधित नागरिकांचीही संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. 

गडचिराेली शहरासह तालुक्यात ४२ पाॅझिटिव्ह रूग्ण आढळले

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील सोनापूर कॉम्प्लेक्स १, गणेश मंदिर गोकुल नगर  ४, टिचर्स कॉलनी अयोध्या नगर १, रामनगर  २,  बालाजी नगर चामोर्शी रोड १, पोटेगाव  २, सर्वोदय वार्ड २, वाकडी १, लांझेडा वार्ड  ४, शाहु नगर ३, रेड्डी गोडाऊन ४, स्नेह नगर  ४, विवेकानंद नगर १, आझाद चौक १, स्थानिक १, अडपल्ली गोगाव १,  डोंगरे पेट्रोल पंप १, इंदाळा पारडी २, पोलीस संकुल १, राखी गुलवाडा १, अहेरी तालुक्यातील बाधितांमध्ये बोरी १,आलापल्ली १४, प्राणहिता ३, पेरमिली १,  स्थानिक १, तसेच भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक २, पीएचसी मन्नेराजाराम १, पोलीस स्टेशन १, चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये अनखोडा २, आष्टी १, स्थानिक १, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, सीआरपीएफ १, बंगाली कॅम्प  १, बसस्टॉप जवळ १, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये शहीद बाबुराव हायस्कुलजवळील १, सिरोंचा तालुक्यातील नारायणपूरचा १ तसेच देसाईगंज तालुक्यातील हनुमान वार्डमधील १ आदी रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील ५ जणांचाही यात समावेश आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात काेराेना संसर्गाची भीती अधिक निर्माण झाली आहे.  ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात काेराेना पाॅझिटीव्ह रूग्णांची संख्या दिवाळीच्या सुट्यांमध्ये वाढली आहे. बरेच लाेक काेराेनासंदर्भात बिनधास्त हाेऊन गावाेगावी प्रवास केले. यातून अनेकांना बाधा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: 41 corona free and 78 new victims registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.