कृषी निविष्ठांचे ४१ नमुने आढळले अप्रमाणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 06:00 AM2020-06-08T06:00:00+5:302020-06-08T06:00:10+5:30
खते, बियाणे व कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी कृषी विभागाचा परवाना आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यात बियाणे विक्रीची ४२५, खत विक्रीची ६६२ व कीटकनाशक विक्रीची ३३६ दुकाने आहेत. निकृष्ठ दर्जाच्या बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरवठा करून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत काही नमुने तपासले जातात. मागील वर्षीच्या खरीप हंगामात बियाणांचे ४६० नमुने तपासण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कृषी विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाने वर्षभरात रासायनिक खते, कीटकनाशके व बियाणांचे ९५८ नमुने तपासले असता त्यातील ४१ नमुने अप्रमाणित असल्याचे आढळून आले आहे.
खते, बियाणे व कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी कृषी विभागाचा परवाना आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यात बियाणे विक्रीची ४२५, खत विक्रीची ६६२ व कीटकनाशक विक्रीची ३३६ दुकाने आहेत. निकृष्ठ दर्जाच्या बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरवठा करून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत काही नमुने तपासले जातात. मागील वर्षीच्या खरीप हंगामात बियाणांचे ४६० नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ६ नमुने अप्रमाणित आढळून आले. त्यापैकी ५ नमुन्यांविरोधात न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले आहे, तर १ नमुना ताकीदीस पात्र ठरला आहे. रासायनिक खताचे ३९८ नमुने घेतले असता ३१ नमुने अप्रमाणित आढळले.९ नमुने ताकीद पात्र तर २२ नमुने कोर्ट केस पात्र ठरले आहेत. कीटकनाशकांचे ९२ नमुने घेतले असता ४ नमुने अप्रमाणित आढळले आहेत.
कधीकधी बियाणे व खतांची मागणी एकावेळेस वाढते. अशावेळी काही दुकानदार शेतकऱ्यांच्या निरक्षरतेचा गैरफायदा उठवत ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा अधिक दराने खत व बियाणांची विक्री करतात. याचा मोठा फटका शेतकºयाला बसते. याप्रकारांवर आळा घालण्यासाठी कृषी विभागाने १३ भरारी पथकांची निर्मिती केली आहे. प्रत्येक पथकाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच कृषी निविष्ठांबाबत असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे. अनेक कृषी केंद्र चालक शेतकºयांची फसवणूक करतात. शेतकºयांनी तक्रार केल्यानंतर संबंधित कृषी केंद्र चालकाची चौकशी होणे गरजेचे आहे.
बनावट बिलांवर बियाणांची विक्री
कोणत्याही दुकानदाराने माल खरेदीचे ओरिजनल बिल देणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश बियाणे दुकानदार शेतकºयांना ड्युप्लीकेट बिल देतात. बियाणांच्या पॉकेटवर अतिशय जास्त प्रमाणात किमंत लिहीली राहते. त्यापैकी थोड्या कमी किमंतीला बियाणे विकले जाते. शेतकरी निघून गेल्यानंतर त्याच्याच नावाने ओरीजनल बिल बनविले जाते त्यात सदर बियाणांची किमंत आणखी कमी दाखविली जाते. हा प्रकार सर्रास चालत असला तरी आजपर्यंत या प्रकरणी एकाही दुकानावर कारवाई करण्यात आली नाही, हे विशेष. भरारी पथकाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.