४१४ दाखल्यांचे वितरण

By admin | Published: October 6, 2016 02:15 AM2016-10-06T02:15:14+5:302016-10-06T02:15:14+5:30

महाराजस्व अभियानांतर्गत नागरिकांना एका छत्राखाली आणून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिरपूर येथे मंगळवारी विस्तारीत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

414 certificate distributions | ४१४ दाखल्यांचे वितरण

४१४ दाखल्यांचे वितरण

Next

योजनांची दिली माहिती : शिरपूर येथे समाधान शिबिर
कुरखेडा : महाराजस्व अभियानांतर्गत नागरिकांना एका छत्राखाली आणून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिरपूर येथे मंगळवारी विस्तारीत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाधान शिबिरात विविध विभागाकडून ४१४ दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
समाधान शिबिराला नायब तहसीलदार आर. एस. पोरेड्डीवार, शिरपूरचे सरपंच शिवलाल मडावी, उपसरपंच रमेश बावनथडे, पोलीस पाटील विश्वनाथ रामटेके, मंडळ अधिकारी शील आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याला शिरपूर परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. महसूल विभाग, आरोग्य विभाग, तालुका कृषी विभाग यांच्या मार्फतीने माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन नायब तहसीलदार पोरेड्डीवार यांनी केले. यशस्वीतेसाठी पुरवठा निरीक्षक कुमरे, सुरपाम, कनिष्ठ लिपीक श्रीकांत कर्णेवार, धाबेकर यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 414 certificate distributions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.