४२ कर्मचारी आंदोलनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:10 AM2018-01-06T00:10:54+5:302018-01-06T00:11:05+5:30

 42 employees on the agitation | ४२ कर्मचारी आंदोलनावर

४२ कर्मचारी आंदोलनावर

Next
ठळक मुद्देएड्स नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचारी : वेतनातील फरकाची रक्कम मिळण्यासाठी असहकार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाºयांच्या वेतनातील फरकाची रक्कम देण्यास शासन टाळाटाळ करीत आहे. या विरोधात महाराष्टÑ राज्य एड्स नियंत्रण महाराष्ट्र सोसायटी वडाळा मुंबई अंतर्गत येणाºया सर्व कर्मचाऱ्यांचे १ जानेवारी २०१८ पासून असहकार आंदोलन सुरू झाले आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह रूग्णालय असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी गुरूवारपासून एड्स नियंत्रण सोसायटीच्या कर्मचाºयांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून एड्स नियंत्रण कार्यक्रमातील एकूण २ हजार ३०४ कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत, अशी माहिती एड्स नियंत्रण कर्मचारी संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रमोद म्हशाखेत्री यांनी लोकमतला दिली आहे.
एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत सर्व कर्मचारी आधीच तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. असे असताना राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडे कर्मचाºयांच्या प्रलंबित समस्यांबाबत पाठपुरावा करण्यात आला. कर्मचाºयांना वेतनवाढीच्या फरकाची रक्कम, जिल्हा अंतर्गत, जिल्हाबाह्य बदली, सन २०१६-१७ व २०१७-१८ ची वाढ आणि फरकाची रक्कम अद्यापही या कर्मचाºयांना देण्यात आली नाही. संघटनेने या संदर्भातील माहिती वारंवार सोसायटीला दिली. परंतु सोसायटीने या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे.
एड्स नियंत्रण सोसायटीतील गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाशी संलग्नित असलेले सर्व कर्मचारी जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात बसून असहकार आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद म्हशाखेत्री, जिल्हा सचिव शेषराव खोब्रागडे यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले आहेत. याशिवाय अहेरी, धानोरा, कुरखेडा, आरमोरी, चामोर्शी व इतर रूग्णालयाच्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे.
मासिक, आठवडी अहवाल थांबणार
सदर असहकार आंदोलनादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील आयसीटीसी, एआरटी सेंटर, एसटीडी, ब्लड बँक, व डापकू या सर्व विभागाच्या कामाचा कुठलाच मासिक, आठवडी, दैनंदिन अहवाल राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांना पाठविण्यात येणार नसल्याचा निर्णय कर्मचारी संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील एड्स नियंत्रण सोसायटीचे सर्व कर्मचारी या असहकार आंदोलनात सहभागी झाले असले तरी या असहकार आंदोलनामुळे कुठल्याही रूग्णसेवेवर अथवा कर्मचाऱ्यांच्या कामावर कुठल्याच प्रकारचा परिणाम होणार नसल्याची काळजी कर्मचारी संघटनेच्या वतीने घेण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष म्हशाखेत्री यांनी दिली आहे.

Web Title:  42 employees on the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.