कोरेगावात ४२ कुष्ठरुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:41 AM2018-10-25T00:41:05+5:302018-10-25T00:41:25+5:30

राष्ट्रीय कुष्ठरोग दुरिकरण कार्यक्रमअंतर्गत सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग गडचिरोली व अलर्ट इंडिया मुंबईच्या वतीने कोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुष्ठरुग्णांची विकृती प्रतिबंध व विकृती काळजी या बाबत शिबीर घेण्यात आले.

42 leprosy checks in Koregaon | कोरेगावात ४२ कुष्ठरुग्णांची तपासणी

कोरेगावात ४२ कुष्ठरुग्णांची तपासणी

Next
ठळक मुद्देरुग्णांना साहित्य वाटप : योग्य औषधोपचार व नियमित काळजी घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव/चोप : राष्ट्रीय कुष्ठरोग दुरिकरण कार्यक्रमअंतर्गत सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग गडचिरोली व अलर्ट इंडिया मुंबईच्या वतीने कोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुष्ठरुग्णांची विकृती प्रतिबंध व विकृती काळजी या बाबत शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ४२ कुष्ठरुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिषेक कुंभरे होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून अलर्ट इंडिया मुंबईचे अन्सारी, अभिजित कांबळे, राजेश पराते, कुष्ठरोग तंत्रज्ञ दिनकर सन्दोकर आदी उपस्थित होते. आला. डॉ.अभिषेक कुंभरे यांनी कुष्ठरुग्णांनी वेळीच औषधोपचार घेवून सहकार्य केल्यास अपंगत्व टाळू शकतो असे आवाहन केले. या शिबिरात विकृती आलेल्या रुग्णांना घरगुती उपाययोजनेबाबत प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. रुग्णांनी नियमित घरी केल्यास असलेली विकृती जास्त होत नाही. पर्यायाने अपंगत्व टाळू शकतो. आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही तर हात पायाचे बोटे वाकडे होतात. कधी-कधी गळूनही पडतात म्हणूनच रुग्णांना प्रत्यक्ष कृती करून दाखविण्यात आले.
वडसा तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात आली. यासंदर्भात माहिती देण्यात आली. शिबिरात कुष्ठरुग्णांना एमसीआर चप्पल, वय्क्स बाथ, होप डेमो, अल्सर किट आदी साहित्य वितरित करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामधील आशा कार्यकर्त्या यांनी गावा गावातून आणलेल्या ४२ कुष्ठरुग्णांची तपासणी करण्यात आली. प्रस्ताविक संदीप माटे तर आभार आरोग्य सहाय्यक सुरेश कोहाले यांनी मानले.

Web Title: 42 leprosy checks in Koregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य