४४ विद्यार्थी भारत भ्रमणावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 11:16 PM2018-12-20T23:16:22+5:302018-12-20T23:16:52+5:30
शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणारे जिल्ह्यातील सुमारे ४४ विद्यार्थी भारत भ्रमणासाठी गुरूवारी गडचिरोली येथून रवाना झाले असून ते देशभरातील विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणारे जिल्ह्यातील सुमारे ४४ विद्यार्थी भारत भ्रमणासाठी गुरूवारी गडचिरोली येथून रवाना झाले असून ते देशभरातील विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी आयोजित भारत भ्रमण प्रस्तान कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विद्यार्थ्यांच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, नगरसेवक प्रमोद पिपरे, भामरागडचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे, अहेरीचे सहायक प्रकल्प अधिकारी श्रीकांत धोटे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा, अधीक्षक डी.के.टिंगुसले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी भारत भ्रमण सहलीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात व महत्त्वकांक्षेत निश्चितच वाढ होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळणार आहे, असे मार्गदर्शन केले. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे, असे सल्ला दिला.
प्रास्ताविक डॉ.सचिन ओम्बासे, संचालन अनिल सोमनकर तर आभार सहायक प्रकल्प अधिकारी आर.एम.पत्रे यांनी मानले.