४.४० लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:00 AM2020-02-23T06:00:00+5:302020-02-23T06:00:25+5:30

महाशिवरात्री यात्रेनिमित्त चामोर्शी तालुक्यात पोलीस पथक गस्तीवर असताना त्यांना बेकायदेशिरपणे दारूसाठा करून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात पथकाने भेंडाळा येथील आरोपी पंढरी चिरकुटा भोयर याच्या घरी धाड टाकून झडती घेतली. तेथून काही बाटल्या जप्त केल्या.

4.40 lakhs worth of liquor seized | ४.४० लाखांचा दारूसाठा जप्त

४.४० लाखांचा दारूसाठा जप्त

Next
ठळक मुद्देशेतशिवारात ठेवला होता लपवून । एलसीबीच्या पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दारूबंदी असताना महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने चोरून लपून विक्रीसाठी आणून शेतात साठवून ठेवलेला तब्बल ४.४० लाखांचा देशी दारूचा साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी केली.
महाशिवरात्री यात्रेनिमित्त चामोर्शी तालुक्यात पोलीस पथक गस्तीवर असताना त्यांना बेकायदेशिरपणे दारूसाठा करून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात पथकाने भेंडाळा येथील आरोपी पंढरी चिरकुटा भोयर याच्या घरी धाड टाकून झडती घेतली. तेथून काही बाटल्या जप्त केल्या. त्यानंतर फोकुर्डी येथील सोमेश्वर गोहणे व प्रकाश तुमडे यांच्या शेतशिवारात लपवून ठेवलेला देशी दारूचा साठा हुडकून काढून तो जप्त केला. त्यात सुपर सॉनिक रॉकेट संत्रा कंपनीचे ५५ सिलबंद बॉक्स (५५०० निप) एवढा मुद्देमाल होता. या प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांच्याविरूद्ध चामोर्शी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले.

घरपोच केला जातो विक्रेत्यांना पुरवठा
दारूबंदी नसलेल्या सीमेलगतच्या जिल्ह्यातील देशी-विदेशी दारू साठवणूक करून ती चारचाकी आणि दुचाकी वाहनांनी चिल्लर दारू विक्रेत्यांना त्यांच्या घरपोच पोहोचविली जाते. त्यातून अनेक गावांमध्ये दारूच्या बाटल्या अधिक किमतीत सहज मिळतात. त्यावर अंकुश लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कारवाईची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली.

Web Title: 4.40 lakhs worth of liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.