४४६८ जणांना मिळणार मोफत गॅस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 05:00 AM2020-04-27T05:00:00+5:302020-04-27T05:00:23+5:30

केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत तीन महिने मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. धानोरा शहरातील गॅस एजंसीच्या वतीने तालुक्यातील एकूण ४ हजार ४६८ लाभार्थ्यांना तीन महिन्याचे सिलिंडर मोफत देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस धारकांना एप्रिल ते जून २०२० दरम्यान तीन सिलिंडर मोफत देण्याची योजना आखली आहे.

4468 people will get free gas | ४४६८ जणांना मिळणार मोफत गॅस

४४६८ जणांना मिळणार मोफत गॅस

Next
ठळक मुद्देसंचारबंदीत दिलासा : उज्ज्वला योजनेच्या तालुक्यातील लाभार्थ्यांना तीन महिने सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन घोषित केले आहे. परिणामी कामधंदे व व्यवसाय बंद पडून लोक रिकाम्या हाताने घरी बसले आहेत. परिणामी आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब सर्वसामान्य कुटुंबांसाठी तीन महिने मोफत सिलिंडर मिळाणार आहे. विशेष म्हणजे ही सुविधा उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे.
केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत तीन महिने मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. धानोरा शहरातील गॅस एजंसीच्या वतीने तालुक्यातील एकूण ४ हजार ४६८ लाभार्थ्यांना तीन महिन्याचे सिलिंडर मोफत देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस धारकांना एप्रिल ते जून २०२० दरम्यान तीन सिलिंडर मोफत देण्याची योजना आखली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उज्ज्वला गॅसधारकांच्या बँक खात्यावर एका सिलिंडरची रक्कम ८०३.५० रूपये जमा करण्यात आली आहे. ग्राहकांनी आपल्या खात्यातून सदर रक्कम काढून अथवा आपल्याकडील रक्कम वापरून ३० एप्रिल २०२० च्या आत सिलिंडर घेतल्यास पुन्हा मे महिन्यात दुसऱ्या सिलिंडरची रक्कम जमा करण्यात येणार आहे. ३१ मे २०२० च्या आत दुसरा सिलिंडर सोडविल्यास पुन्हा जून महिन्यात तिसऱ्या सिलिंडरची रक्कम जमा होईल. लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर सिलिंडरची रक्कम जमा झाल्यावर त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅप किंवा ऑनलाईन अ‍ॅपने सिलिंडर बुकिंग केल्यानंतर गॅस एजंसीमार्फत लाभार्थ्यांना घरपोच गॅस सिलिंडर पोहोचविण्यात येणार आहे.
लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने लाभार्थ्यांनी गॅस एजंसीमध्ये गर्दी न करता गावात गॅस एजंसीची गाडी आल्यावर एजंसीच्या कर्मचाऱ्यांकडून योजनेविषयी गॅस सिलिंडरची रक्कम जमा झाली किंवा नाही, याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन एजंसीच्या वतीने करण्यात आले आहे.

रोकडसाठी करावी लागत आहे धावपळ
सरकारकडून गॅस सिलिंडर मोफत मिळत असला तरी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना रोख रक्कम देऊन सिलिंडर घ्यावे लागत आहे. कोरोनाच्या संचारबंदीमुळे साधनांअभावी वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी काही अंतरावर असलेल्या गावातील बँक शाखेत जाऊन पैैसे काढण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. ग्रामीण भागात बँकेचे जाळे नसल्याने संचारबंदीच्या काळात काही अंतरावर जाऊन पैैसे काढणे शक्य होत नाही. बँक खात्यातून ८०० रूपये काढण्यासाठी ५० ते ७० किमी अंतर गाठावे लागत आहे. धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागात रस्ते व वाहतुकीची समस्या आहे. त्यामुळे रोकडअभावी लाभार्थ्यांना अडचण जात आहे.

Web Title: 4468 people will get free gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.