४५ लाभार्थ्यांना मिळाला गॅस

By admin | Published: June 17, 2016 01:27 AM2016-06-17T01:27:25+5:302016-06-17T01:27:25+5:30

तालुक्यातील ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या वतीने नुकताच जनजागरण मेळावा ताडगाव येथे पार पडला.

45 beneficiaries get gas | ४५ लाभार्थ्यांना मिळाला गॅस

४५ लाभार्थ्यांना मिळाला गॅस

Next

९८ शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे : ताडगावच्या मेळाव्यात पोलीस मदत केंद्रातर्फे जनजागरण
भामरागड : तालुक्यातील ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या वतीने नुकताच जनजागरण मेळावा ताडगाव येथे पार पडला. या मेळाव्यात ४५ लाभार्थ्यांना स्वयंपाक गॅस तर ९८ शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे वितरित करण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात आयोजित जनजागरण मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत होते. प्रमुख अतिथी म्हणून ताडगावचे वनपरिक्षेत्राधिकारी अनिल गेडाम, पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी परजने, पोलीस उपनिरीक्षक पाटील, उपस्थित होते. जनजागरण मेळाव्यात ४५ लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर, ९८ शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे वितरित करण्यात आले.
नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन विकास साधावा. स्वयंपाक गॅसचा वापर करून वृक्षतोड होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, वनसंवर्धनास हातभार लावावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी अधिकारी परजने यांनी केले. संचालन पोलीस उपनिरीक्षक दीपक दडवी तर आभार पोलीस उपनिरीक्षक बोरसे यांनी मानले.
जनजागरण मेळाव्यात ताडगाव, केडमारा, कोसफुंडी, इरकडुम्मे, केहकापरी, कुडकेली, धुळेपल्ली आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिक भोजनाने जनजागरण मेळाव्याची सांगता करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 45 beneficiaries get gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.