धानोरा येथे निराधार याेजनेची ४५ प्रकरणे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:24 AM2021-06-24T04:24:49+5:302021-06-24T04:24:49+5:30
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समाजातील निराधार व्यक्तींना अर्थसहाय्य दिले जाते. संजय गांधी निराधार अनुदान समितीला संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ...
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समाजातील निराधार व्यक्तींना अर्थसहाय्य दिले जाते. संजय गांधी निराधार अनुदान समितीला संजय गांधी निराधार योजनेंतर्गत १८ पैकी १८ प्रकरणे मजूर करण्यात आली. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन अंतर्गत १५ पैकी १५ प्रकरणे मंजूर करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेंतर्गत १२ प्रकरणे प्राप्त झाली, त्यापैकी ९ प्रकरणे मजूर करण्यात आली तर ३ प्रकरणे नामंजूर करण्यात आली.
या बैठकीला समितीचे सदस्य सचिव तहसीलदार सी. जी. पित्तुलवार, नायब तहसीलदार धनराज वाकुलकर, अशासकीय सदस्य इंदिरा वाढई, प्रकाश मारभते, बाबूराव गेडाम, गुलाब ठाकरे, पंचायत कृषी विस्तार अधिकारी अशोक ठाकरे, अव्वल कारकून वनिश्याम येरमे, एम. एच. मडावी, पी. एफ. खोब्रागडे उपस्थित होते.