भाग्यश्रीला ४५ हजारांची मदत
By Admin | Published: March 11, 2017 01:38 AM2017-03-11T01:38:12+5:302017-03-11T01:38:12+5:30
देचलीपेठा येथील रहिवासी असलेल्या भाग्यश्री लक्ष्मण दुर्गे ही विद्यार्थीनी कॅन्सरने ग्रस्त असून सध्या
पोलीस विभागाचे सहकार्य : देचलीपेठा येथील कॅन्सरग्रस्त विद्यार्थिनी
जिमलगट्टा : देचलीपेठा येथील रहिवासी असलेल्या भाग्यश्री लक्ष्मण दुर्गे ही विद्यार्थीनी कॅन्सरने ग्रस्त असून सध्या तिच्यावर मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. उपचारासाठी चार लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. पोलीस विभाग तसेच पत्रकार संघाने पुढाकार घेत तिला ४५ हजार रूपयांची आर्थिक मदत दिली.
उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या पुढाकारातून उपपोलीस स्टेशन जिमलगट्टा, मरपल्ली, रेपनपल्ली, दामरंचा, देचलीपेठा येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाग्यश्रीच्या उपचारासाठी ४० हजार २५० रूपयांचा निधी जमा केला व सदर निधी जिमलगट्टा पत्रकार संघाकडे सुपूर्द केला. येथील पत्रकार संघाने भाग्यश्री दुर्गे हिच्या बँक आॅफ इंडिया अहेरीच्या शाखेत सदर रक्कम जमा केली. ग्रामीण पत्रकार संघ जिमलगट्टा व तालुका संघर्ष समिती जिमलगट्टा यांच्यावतीने पाच हजार रूपयांची आर्थिक मदत कॅन्सरग्रस्त भाग्यश्रीला देण्यात आली. जिमलगट्टा येथे नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकातून पत्रकार संघाकडे निधी जमा झाला होता. (वार्ताहर)