मालवाहू वाहनातून देशीदारूची आयात, ४.६२ लाखांचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:49 AM2021-02-27T04:49:38+5:302021-02-27T04:49:38+5:30

आरमोरी : मालवाहू पीकअप वाहनातून देशी दारूची आयात करण्याचा प्रयत्न आरमोरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. ही कारवाई गुरूवारच्या ...

4.62 lakh goods seized from freight vehicles | मालवाहू वाहनातून देशीदारूची आयात, ४.६२ लाखांचा माल जप्त

मालवाहू वाहनातून देशीदारूची आयात, ४.६२ लाखांचा माल जप्त

Next

आरमोरी : मालवाहू पीकअप वाहनातून देशी दारूची आयात करण्याचा प्रयत्न आरमोरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. ही कारवाई गुरूवारच्या रात्री आरमोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मानापूरजवळ करण्यात आली. हे वाहन गडचिरोली येथे जाणार होते.

सदर वाहनाबाबतची माहिती पोलिसांना मिळताच आरमोरी पोलिसांनी मानापूर येथे सापळा लावला. त्यात पिक अप वाहन क्रमांक एमएच ३३, व्ही २०५१ याची तपासणी केली असता त्यात ७७ पेट्या संत्रा देशी दारू (किंमत ४ लाख ६२ हजार रुपये) होती. सदरचे वाहनामध्ये दारू लपवण्याकारिता खास लोखंडी कप्पे बनविले होते. आरोपी विजय काशीनाथ वनकर रा.अडपल्ली याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून एक मोबाईलही जप्त करण्यात आला.

ही कारवाई धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सपोनि पंकज बोडसे, चेतन चव्हाण, हवालदार प्रशांत वऱ्हाडे, नायक लक्ष्मण नेताम, पातीराम मडावी, शिपाई प्रवीण वाकडे यांनी केली.

Web Title: 4.62 lakh goods seized from freight vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.