४९ वन तस्करांनी केले आत्मसमर्पण

By admin | Published: June 14, 2014 02:14 AM2014-06-14T02:14:30+5:302014-06-14T02:14:30+5:30

सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली वनपरिक्षेत्रात अवैध सागवान तोड व तस्करीला आळा घालण्यासाठी वनविभागाकडून अनेक प्रयत्न होत आहे.

49 9 Surrenders made by forest smugglers | ४९ वन तस्करांनी केले आत्मसमर्पण

४९ वन तस्करांनी केले आत्मसमर्पण

Next

आसरअल्ली : सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली वनपरिक्षेत्रात अवैध सागवान तोड व तस्करीला आळा घालण्यासाठी वनविभागाकडून अनेक प्रयत्न होत आहे. याचाच एक

भाग म्हणून वनविभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये परिसरातील ४१ वनतस्करांनी आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिरोंचाचे उपवनसंरक्षक राजकुमार शुक्ला होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय

वनाधिकारी यशवंत बहाले, आसरअल्लीचे सरपंच शुक्रचार्य सिडाम, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन कलाक्षपवार, आसरअल्लीचे पोलीस निरीक्षक ओडी, पोलीस

उपनिरीक्षक चव्हाण, डॉ. चर्चे, श्रीकांत सुरमवार उपस्थित होते. यावेळी उपवनसंरक्षक शुक्ला यांनी आत्मसमर्पण योजनेंतर्गत वन विभागापुढे आत्मसमर्पण केलेल्या ४९ वन

तस्करांना आर्थिक मदत मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)

Web Title: 49 9 Surrenders made by forest smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.