अहेरी विधानसभेसाठी २९० केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 06:00 AM2019-09-25T06:00:00+5:302019-09-25T06:00:29+5:30
निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. या आचारसंहितेचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राजकीय पक्षांची व्होटर स्लिप ही पांढºया रंगाच्या कोºया कागदावर असावी, या स्लिपवर कोणत्याही पक्षाचे चिन्ह, उमेदवाराचे नाव, वॉटर मार्क नसावे, वोटर स्लिप प्रिंडेट किंवा झेरॉक्स असू शकते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्रात २९० मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. या मतदान विधानसभा क्षेत्रात एकूण २ लाख ३६ हजार २८६ मतदार आहेत, अशी माहिती अहेरीचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी मनिष लोणारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. या आचारसंहितेचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राजकीय पक्षांची व्होटर स्लिप ही पांढºया रंगाच्या कोºया कागदावर असावी, या स्लिपवर कोणत्याही पक्षाचे चिन्ह, उमेदवाराचे नाव, वॉटर मार्क नसावे, वोटर स्लिप प्रिंडेट किंवा झेरॉक्स असू शकते. मतदार ओळखपत्र असणे म्हणजे मतदाराला मतदानाचा अधिकार प्राप्त होत नाही. तर त्यासाठी मतदार यादीत त्या मतदाराचे नाव असणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव असेल तर निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या ११ पैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर केल्यास मतदान करण्याची परवानगी दिली जाईल. मतदान केंद्रांवर पाणी, वीज, रॅम्प उपलब्ध राहतील. प्रत्येक केंद्रावर बीएलओ राहतील. मतदानापूर्वी मॉकपोल घेण्यात येईल.
निवडणूक आचारसंहितेचा भंग होत असल्यास सी-व्हीजील अॅप, वोटर हेल्पलाईन अॅप, पीडब्ल्यूडी अॅप, कॅन्डीडेट सुविधा अॅप, एनजीएसपी, वोटर टीमोट अॅप तयार करण्यात आले आहेत.
खर्चासाठी उमेदवाराकडे स्वतंत्र बँक खाते असणे आवश्यक आहे. खर्चाची मर्यादा २८ लाख रुपये देण्यात आली आहे. उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केल्यापासून खर्चाचा हिशोब दुपारी २ वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. अंतिम हिशोब उमेदवार निवडून आल्यानंतर ३० दिवसांत दाखल करणे बंधनकारक राहील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीष लोणारकर यांनी दिली.
दुपारपर्यंत स्वीकारणार निमनिर्देशन पत्र
२७ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या कालावधीत कार्यालयीन दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील. २८ तारखेला चौथा शनिवार, २९ ला रविवार असल्याने या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार नाहीत. ५ आॅक्टोबर रोेजी उमेदवारी अर्जाची छाननी होईल. ७ आॅक्टोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिनांक असेल. २१ आॅक्टोबर रोजी मतदान होईल. मतदानाच्या दिवसाच्या ४८ तासांच्या अगोदर प्रचार बंद करण्यात येईल.
नवीन अधिकाºयासाठी आव्हानात्मक काम
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अहेरीचे उपविभागीय अधिकारी म्हणून मनिष लोणारकर दोन दिवसांपूर्वी रुजू झाले. गडचिरोली जिल्ह्यात हा उपविभाग आणि अहेरी मतदार संघ नक्षलदृष्ट्या सर्वाधिक संवेदनशिल भाग आहे. या मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळताना लोणारकर यांना पोलीस विभागाशी समन्वय ठेवत ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत या उपविभागात नक्षल्यांनी निवडणूक प्रक्रियेत अडथळे आणले तरी या भागात सर्वाधिक मतदान झाले होते हे विशेष.