वाहनासह ५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:23 PM2019-03-20T22:23:25+5:302019-03-20T22:23:47+5:30
गोंदिया जिल्ह्यातून गेवर्धा मार्गे दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला पोलिसांनी अडवून या वाहनातील २८ पेट्या देशी दारू जप्त केल्याची कारवाई बुधवारी पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास गेवर्धा-केशोरी मार्गावरील खैरी फाट्याजवळ करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : गोंदिया जिल्ह्यातून गेवर्धा मार्गे दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला पोलिसांनी अडवून या वाहनातील २८ पेट्या देशी दारू जप्त केल्याची कारवाई बुधवारी पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास गेवर्धा-केशोरी मार्गावरील खैरी फाट्याजवळ करण्यात आली. चारचाकी वाहन व २८ पेट्या दारू मिळून एकूण पोलिसांनी ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाईदरम्यान वाहनचालकाने अंधाराचा फायदा घेत तो जंगलात पळून गेला. मात्र घटनास्थळाजवळ संशयास्पद स्थितीत फिरत असलेला तसेच अवैध दारू व्यावसायिकांना पोलिसांच्या गुप्त हालचालीची माहिती देणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. व्यंकट सनकू पुराम (४९) रा. गेवर्धा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गोंदिया जिल्ह्यातून कुरखेडा तालुक्याच्या गेवर्धा मार्गे गडचिरोली जिल्ह्यात चारचाकी वाहनाने दारूचा पुरवठा होत असल्याची गुप्त माहिती कुरखेडाचे पोलीस निरिक्षक सुरेश चिल्लावार यांना मिळाली. त्यांनी रात्रीपासून या मार्गावर वाहन अवरोधक लावत सापळा रचला होता. दरम्यान गेवर्धा मार्गे येणाºया एमएच २७ बीई १०४३ क्रमांकाच्या वाहनास थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने वाहन जंगलातच सोडून पळ काढला. यावेळी गेवर्धा येथील व्यंकट सनकू पुराम हा इसम घटनास्थळाजवळ जंगलात संशयास्पदरित्या अंधारात फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. पोलिसांच्या गुप्त हालचालीची माहिती अवैध व्यावसायिकांना तो देत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पोलिसांनी पुराम याला मुंबई दारूबंदीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणातील फरार आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. सदर कारवाई कुरखेडाचे पोलीस निरिक्षक सुरेश्सा चिल्लावार यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरिक्षक एस. आर. केदार, पोलीस उपनिरिक्षक प्रशांत रेळेकर, हवालदार रमेश बगमारे, दलपत मडावी, मनोहर पुराम, निरंजन जाधव, रघुनाथ हिडामी, भरत डांगे यांनी केले.