विनयभंग करणाऱ्यास पाच वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:19 AM2018-04-28T00:19:04+5:302018-04-28T00:19:04+5:30

अल्पयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली विशेष सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

5 years imprisonment for molestation | विनयभंग करणाऱ्यास पाच वर्षांचा कारावास

विनयभंग करणाऱ्यास पाच वर्षांचा कारावास

Next
ठळक मुद्देतीन हजार रूपये दंड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अल्पयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली विशेष सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पीडित मुलगी २८ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान आपल्या आई व मैत्रीणीसोबत बँकेत आधार लिंक करण्याकरिता जात होती. दरम्यान घराशेजारी राहणाऱ्या संजय सोमा मेश्राम याने पीडित मुलीची मान व कंबर पकडून तिला खाली पाडले. तिच्यासोबत असलेल्या आईने त्याच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने पीडित बालिकेच्या आईला सुद्धा धक्का देऊन खाली पाडले. पीडित महिला कशीबशी पडत शेजारच्या घरी आश्रयाला गेली. पीडित मुलीच्या आईने याबाबतची तक्रार गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यावरून गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये भादंवि ३५४, ५०९, ३२३ चे सहकलम ८, १२, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे साक्षीदारांचे बयान नोंदविला. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने २७ एप्रिल रोजी निकाल देताना आरोपीला कलम ३५४ अन्वये दोषी ठरविले. यासाठी पाच वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर बाल लैंगिक अत्याचार अधिनियम ५ अन्वये सश्रम कारावास, एक हजार रूपये दंड, कलम ३५४ (डी) (१) (आय) अन्वये तीन वर्षांचा कारावास व ५०० रूपये दंड, कलम ३२३ अन्वये एक वर्ष कारावास व ५०९ अन्वये तीन वर्ष कारावास व ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
सदर निकाल विशेष सत्र न्यायाधीश श्रेणी १ यू.एम.पदवाड यांनी दिला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी काम पाहिले.

Web Title: 5 years imprisonment for molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग