५० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:46 AM2017-11-30T00:46:06+5:302017-11-30T00:46:17+5:30
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत २८ नोव्हेंबर २०१७ रोजी गडचिरोली शहरातील धानोरा मार्ग, चामोर्शी व गडचिरोली मार्गावरील दुकाने तसेच इंदिरा गांधी चौकातील दुकानांमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा प्लास्टिकवर बंदी घालण्याची मोहीम सुरू केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत २८ नोव्हेंबर २०१७ रोजी गडचिरोली शहरातील धानोरा मार्ग, चामोर्शी व गडचिरोली मार्गावरील दुकाने तसेच इंदिरा गांधी चौकातील दुकानांमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा प्लास्टिकवर बंदी घालण्याची मोहीम सुरू केली. मंगळवारी ५० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आल्या.
मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांच्या नेतृत्वात मोहीम राबविण्यात आली. यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घातली आहे. घनकचºयामध्ये सर्वाधिक प्रमाण प्लास्टिक पिशव्यांचे राहते. विशेष म्हणजे, या पिशव्या कित्येक वर्ष नष्ट होत नाही. परिणामी घनकचºयाची समस्या गंभीर होते. गडचिरोली शहरातील दुकानदार, भाजीपाला विक्रेत्यांनी यानंतर वापर केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा मोहिमेदरम्यान दिला.
नगर परिषदेने अशा प्रकारची मोहीम अधूनमधून राबवावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.