गडचिराेली जिल्ह्यात १ वाजेपर्यंत ५०.८९ टक्के मतदान ; अहेरीत सर्वाधिक मतदान
By गेापाल लाजुरकर | Published: November 20, 2024 02:34 PM2024-11-20T14:34:28+5:302024-11-20T14:36:40+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अहेरी विधानसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान
गडचिराेली : विधानसभेसाठी बुधवार, २० नाेव्हेंबर राेजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपला हक्क बजावला. जिल्ह्याच्या तीनही विधानसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ५०.८९ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात बुधवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाली. त्यानंतर मतदारांनी बुथवर जाऊन मतदानाचा हक्क बजावण्यास सुरूवात केली.
सकाळी ९ वाजेपर्यंत आरमाेरी विधानसभा मतदारसंघात १३.५३ टक्के, गडचिराेली क्षेत्रात १२.२, अहेरीत ११.२४ टक्के मतदान झाले. सकाळी ११ वाजेपर्यंत आरमाेरी क्षेत्रात ३०.७५ टक्के, गडचिराेलीत २९.३२ टक्के तर अहेरी क्षेत्रात ३०.०६ टक्के मतदान झाले. दुपारी १ वाजेपर्यंत आरमाेरी विधानसभा मतदारसंघात ५१.०५ टक्के, गडचिराेलीत ४९.१७ टक्के तर अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के मतदान झाले. अहेरी विधानसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान झाले. तीनही विधानसभा मतदारसंघातील मतदानाची सरासरी टक्केवारी ५०.८९ आहे.