धमदीटोलात ५२ जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:21 PM2019-04-19T22:21:14+5:302019-04-19T22:22:12+5:30
आदिवासी कंवर समाज क्षेत्रीय समिती नान्ही यांच्या वतीने धमदीटोला (नान्ही) येथे १८ एप्रिल रोजी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात कंवर समाजाचे सुमारे ५२ जोडपी विवाहबध्द झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : आदिवासी कंवर समाज क्षेत्रीय समिती नान्ही यांच्या वतीने धमदीटोला (नान्ही) येथे १८ एप्रिल रोजी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात कंवर समाजाचे सुमारे ५२ जोडपी विवाहबध्द झाले.
विवाह सोहळ्याप्रसंगी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे क्षेत्रीय अध्यक्ष सुनेहर सोनटापर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे संचालक भरत दुधनाग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ. मेघराज कपूर, जि.प. सदस्य प्रल्हाद कराडे, प्रभाकर तुलावी, माजी जि.प. सदस्य अशोक इंदूरकर, पं.स. सदस्य धर्मा उईके, रूखमन घाटगुमर, गुलाब सोनकुकरा, पं.स. सभापती गिरीधर तितराम, काशिफ जमा कुरेशी, काँग्रेस तालुकाध्यक्ष जयंत हरडे, माजी जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, माजी पं.स. सदस्य धर्मदास उईके, सरपंच उमाजी धुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
आदिवासी कंवर समाज क्षेत्रीय समितीच्या वतीने मागील १४ वर्षांपासून सामुहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम राबविला जात आहे. कंवर समाज हा प्रामुख्याने कोरची तालुका, गोंदिया जिल्ह्यात व छत्तीसगड राज्यात वास्तव्यास आहे. त्यामुळे याच भागातील नागरिक या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. मेघराज कपूर यांनी समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांना समाजाच्या इतिहासाची माहिती असणे गरजेचे आहे. अयोग्य व कालबाह्य रूढीपरंपरांना फाटा देत समाजाला योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. कपूर यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन समितीचे कोषाध्यक्ष कृष्णा चंद्रमा तर आभार निलकंठ बखर यांनी मानले. यशस्वीतेसाठी सोनू कपूर, रामविलास केवास, सत्यशिव सोनवानी, राधेलाल कपूर, राजेंद्र कपूर, ब्रिजबत्ती सांगसुरवार, अगसीया थाटमुर्रा, जितलाल करसाल, प्रभूदास चंद्रमा, कैलास सोंजाल, दयालू सोनकुकरा, मदन ब्रह्मणायक यांनी सहकार्य केले.